पाणीपुरीचे स्टफिंग - Filling For Pani Puri

Stuffing For Pani Puri in English

इतर संबंधित पाककृती:
पाणीपुरीच्या पुर्‍या
पाणीपुरीचे पाणी

pani puri, golgappa, mumbai chat food, Bombay chat recipes, Bhelpuri Panipuri, dahi batata puri, aloo chat
पाणीपुरीचे फिलिंग - १
साहित्य:
३/४ कप हिरवे मूग
चिमूटभर हळद (ऐच्छिक)
चवीपुरते मिठ
कृती:
१) मूग ८ ते ९ तास कोमट पाण्यात भिजवावेत. त्यांना मोड काढून ते शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मिठ घालावे
टीप: शिजवताना चिमुटभर हळद घालावी. त्याने मूगाचा उग्रपणा कमी होतो तसेच रंगही येतो.

पाणीपुरीचे फिलिंग - २
साहित्य:
३/४ कप पांढरे वाटाणे
चिमूटभर हळद,
चवीपुरते मीठ
कृती:
पांढरे वाटाणे ५ ते ६ तास कोमट पाण्यात भिजवावेत. ते मऊ शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मिठ घालावे.
टीप: शिजवताना चिमुटभर हळद घालावी. त्याने मूगाचा उग्रपणा कमी होतो तसेच रंगही येतो.

पाणीपुरीचे फिलिंग - ३
साहित्य:
३/४ कप हिरवे मूग
१ शिजवलेला बटाटा
चाट मसाला
मीठ
कृती:
मूग वरील कृतीप्रमाणे मोड आणून शिजवून घ्यावे. शिजवलेला बटाटा निट कुस्करून घ्यावा. त्यात शिजलेले मूग घालावे, चवीपुरते मिठ आणि चाट मसाला घालावा.

पाणीपुरी फिलिंग - ४
साहित्य:
२ उकडलेले बटाटे
१/२ टिस्पून भाजलेले जिरे, कुटून
चवीपुरते मिठ
चिमूटभर लाल तिखट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
कृती:
१) बटाटे सोलून कुस्करून घ्या. त्यात कुटलेले जिरे आणि मिठ घालून मिक्स करा.
२) एका मध्यम वाडग्यामध्ये हे मिश्रण काढून त्यावर लाल तिखट आणि कोथिंबीर पेरून सजवा.
टीप: लाल रंगाचे बटाटे (रेड पोटॅटो) वापरू नयेत. लाल बटाटे कुस्करल्यावर त्यांना चिकटपणा असतो.

पाणीपुरी फिलिंग - ५
साहित्य:
१/२ कप खारी बुंदी किंवा मसाला बुंदी
कृती:
पुरीला भोक पाडून त्यात १ टीस्पून बुंदी भरावी त्यात तिखट-गोड पाणी भरून पाणीपुरी खावी.
अजून एक आयडिया म्हणजे तिखट पाण्यात बुंदी घालावी त्यामुळे बुंदी फुलेल. तिखट पाणी आणि फुगलेली बुंदी पुरीत भरावी आणि खावी.

पाणीपुरी फिलिंग - ६
साहित्य:
१/४ कप कैरीचे बारीक काप
चिमूटभर मिठ
चिमूटभर लाल तिखट
कृती:
कैरीच्या कापांवर लाल तिखट आणि मिठ पेरावे आणि वरील कोणत्याही स्टफिंग बरोबर पाणीपुरीत भरून खावे.

Labels:
Pani Puri, Puchka, golgappa, panipuri recipe

No comments:

Post a Comment