३/४ कप किसलेले सुके खोबरे (सुक्या खोबर्याची १/२ वाटी)
१ टेस्पून खसखस
१५० ग्राम खडीसाखर
४ वेलचींची पूड
६ ते ७ खारका
८ ते १० बदाम
कृती:
१) खारकांच्या बिया काढून टाकाव्यात आणि खारकांची पूड करून घ्यावी. बदामाची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी.
२) किसलेले सुके खोबरे मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे परातीत काढावे.
३) मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. खलबत्त्यात कुटून घ्यावी.
४) बदामाची पूड आणि खारकांची पूड मध्यम आचेवर भाजून घ्यावी. खुप जास्त भाजू नये नाहीतर करपू शकते.
५) खडीसाखर खलबत्त्यात थोडी कुटून घ्यावी. भाजलेले खोबरे, भाजलेले खसखस, भाजलेली बदाम-खारकांची पूड, खडीसाखर आणि वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये भरडसर खिरापत तयार करून घ्यावी.
ही खिरापत गणपतीत प्रसाद म्हणून वाटतात.
टीप:
१) खिरापतची पावडर नको असेल तर त्यात बेदाणे, खारका यांचे छोटे छोटे तुकडे करून घालावेत.
Labels:
Khirapat, Panchakhadya, Ganesha naivedya
No comments:
Post a Comment