पालक पुरी - Palak Puri

Palak Puri in English

वाढणी: ३० ते ३५ पुर्‍या

palak puri, spinach puri, poori recipe, indian flat bread, fried puri
साहित्य:
१ कप चिरलेला पालक
दिड कप कणीक (गव्हाचे पीठ)
१/२ टिस्पून चमचा हळद
१ टिस्पून जीरे
१-२ चिमटी कसूरी मेथी
४-५ बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ
१ टेस्पून + तळण्यासाठी तेल

कृती:
१) कणिक परातीत घ्यावी. १ टेस्पून तेल कडक गरम करून त्याचे मोहन घालावे.
२) कणकेत चिरलेला पालक, वाटलेल्या मिरच्या, कसूरी मेथी, चवीपुरते मिठ, हळद, जीरे घालावे. आणि पिठ घट्ट मळून घ्यावे.
३) थोडावेळ पिठ झाकून ठेवावे. नतंर त्याचे गोटीएवढे गोळे करावे. त्याच्या छोट्या पुर्‍या लाटाव्यात. काटा-चमच्यातील काट्याने पुरीवर ५-६ वेळा टोचावे (फोटो) त्यामुळे पुर्‍या फुगणार नाहीत.हे करत असतानाच कढईत तेल तापत ठेवावे. पुर्‍या मध्यम गॅसवर तळाव्यात. एकदम गरम तेलात भराभर तळून काढू नयेत त्यामुळे पुर्‍या नरम पडतात आणि पुर्‍यांना आवश्यक कडकपणा येत नाही.
४) तळलेल्या पुर्‍या थोडावेळ टीपकागदावर काढून ठेवाव्यात. पुर्‍या थोड्या निवळल्या कि डब्यात भरून ठेवाव्यात.

Labels:
Spinach Puri, Spinach crunchy Snack

No comments:

Post a Comment