पुढील चाटची कृती म्हणजे चौपाटीवर मिळणारे चना चाट. मी पूर्वी दादर चौपाटीवर, शिवाजीपार्कला बर्याचदा हे चना चाट खायचे. सर्वांच्याच आवडीचा आणि सोपा असा हा पदार्थ चविष्ठही आहे.

साहित्य:
१ वाटी काळे/हिरवे चणे
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
१ हिरवी मिरची
लिंबाचा रस
चाट मसाला
काळे मिठ
कोथिंबीर
मीठ
कृती:
१) चणे १०-१२ तास पाण्यात भिजत ठेवावे. चणे भिजले कि कूकरमध्ये व्यवस्थित मऊ शिजवून घ्यावे. शिजवताना पाण्यात मिठ घालावे.
२) कांदा, टोमॅटो, मिरची तिन्ही बारीक चिरून घ्यावे. शिजलेले चणे थोडे गरम असतानाच त्यात चवीनुसार लिंबाचा रस, काळे मिठ, कोथिंबीर, चाट मसाला घालावा. आवडीप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरची घालावी. सर्व छान मिक्स करावे.
टीप: १) जर कैरी उपलब्ध असेल तर त्याचे बारीक तुकडेही छान लागतात.
Labels:
Chana Chat, Chat Recipes, Channa Chat
No comments:
Post a Comment