Farali Misal (English Version) (स्टेप बाय स्टेप इमेजेससाठी इथे क्लिक करा)
वाढणी : ३-४ प्लेट
साहित्य:
::::शेंगदाण्याच्या उसळीसाठी::::
३/४ कप शेंगदाणे
१ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१/२ कप पाणी
२ आमसुलं
२-३ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मिठ
::::बटाट्याची भाजी::::
२ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१ टिस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
::::साबुदाण्याची खिचडी::::
३/४ कप साबुदाणा
२ टिस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून ओला नारळ
दिड ते २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरती साखर आणि मिठ
१ टिस्पून लिंबाचा रस
इतर साहित्य:
बटाटा सळी
चिरलेली कोथिंबीर
मिरचीचा ठेचा (मिरची + मिठ + थोडीशी जिरेपूड)
दही
कृती:
१) सर्वप्रथम शेंगदाणे ७-८ तास पाण्यात भिजत घालावेत. मिठ घालून कूकरमध्ये शिजवावेत.
२) साबुदाणे ४-५ तास भिजवावेत. उरलेले पाणी काढून टाकावे व साबुदाणे झाकून ठेवावे.
३) बटाट्याची भाजी - इथे क्लिक करा
४) शेंगदाण्याची उसळ - इथे क्लिक करा
बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची उसळ आधी करून ठेवली तरी चालते, पण साबुदाणा खिचडी आयत्यावेळी करावी कारण साबुदाण्याची खिचडी थंड झाली कि तिची चव उतरते.
५) साबुदाणा खिचडी -
भिजवलेल्या साबुदाण्याला साखर आणि मिठ अगोदरच लावून घ्यावे. कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. साबुदाणे घालून परतावे. नंतर नारळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. १ वाफ काढावी. लिंबाचा रस घालून ढवळावे.
मिसळ करताना सर्व पदार्थ गरम करावेत.
प्लेट किंवा बोलमध्ये आधी १ डाव बटाट्याची भाजी, खिचडी आणि मग दाण्याची उसळ अशा क्रमाने वाढावे. लिंबू पिळावे. त्यावर बटाटा सळी घालावी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. तसेच सर्व्ह करताना बाजूला दही वाढावे.
जर तिखटपणा हवा असेल तर मिरचीचा ठेचा घालावा.
टीप:
१) जर बटाटा सळी नसेल किंवा त्याऐवजी दुसरे काही वापरायचे असेल तर घरगुती बटाट्याचा चिवडा वापरावा. तसेच बटाटा चिवडा विकतही आणू शकतो.
२) या मिसळीत बरेच वेरिएशन्स करता येतात. जसे बटाट्याच्या भाजीसारखीच सुरण-भोपळ्याची भाजी करता येते. तसेच खमंग काकडीही बनवून मिसळीत घालू शकतो.
Labels:
Maharashtrian Recipe, marathi recipe, fasting food, upvas recipe, Potato recipe, Indian food recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment