Panhe (English version)
पन्हे बनविण्याच्या बर्याच पद्धती आहेत. खाली दिलेल्या पद्धतीत पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, ज्यामुळे गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते.
साहित्य:
दिड कप कैरीचा गर (कृती क्र. १)
२ कप साखर
१ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर
कृती:
१) साधारण एक मोठी कैरी (साधारण १ ते दिड पौंड) कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२) साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी (साधारण १/२ ते पाउण कप)घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी, कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.
टीप:
१) सर्व्ह करताना किंचीत मिठ घातले तरी छान चव येते
२) शक्यतो कैरी आंबट असावी. जर कैरी आंबट नसेल तर त्याप्रमाणे साखर कमी करावी. तसेच कमी आंबट कैरीचे पन्हे पिताना थोडे लिंबू पिळावे.
Labels:
Panha, Raw mango drink, indian mango drink, panhe recipe, maharashtrian recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment