Ratale Kis in English
वाढणी: २-३ जणांसाठी
साहित्य:
साडेचार कप रताळ्याचा किस (३ मोठी रताळी)
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा २-३ सुक्या लाल मिरच्या
१/४ कप कोथिंबीर
१/२ टिस्पून जिरेपूड
3 टेस्पून शेंगदाण्याचा कूट
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
२ टेस्पून कोथिंबीर
१ टेस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून ओल्या नारळाचा चव
कृती:
१) रताळी स्वच्छ धुवून घ्यावीत. मी शक्यतो साले काढत नाही फक्त रताळ्यावर काळपट डाग असतील तेवढे सुरीने काढून टाकते. पण जर वाटले तर साल काढून मग किसावे. रताळी किसताना जवळ एक गार पाणी भरलेले पातेले तयार ठेवावे. अर्धे रताळे किसले कि या पाण्यात टाकावे म्हणजे किसलेले रताळे काळे पडणार नाही.
२) कढईत तूप गरम करावे त्यात जिरे, मिरच्या घालून फोडणी करावी. तसेच १/४ कप कोथिंबीर फोडणीस घालावी. लगेच पाण्यात घातलेले रताळे किस दोन्ही हातांनी पिळून कढईत टाकावे. जिरेपूड घालून निट परतावे. आधी मिठ घालू नये कारण रताळ्याचा किस शिजत आला कि बराच आळतो आणि मिठाचा अंदाज चुकू शकतो.
३) मध्यम आचेवर रताळ्याचा किस झाकण न ठेवता शिजू द्यावा. कालथ्याने निट ढवळावे. ६-७ मिनीटांत रताळ्याचा किस आळतो तसेच अर्धवट शिजतो. त्यात थोडे मिठ, साखर, शेंगदाण्याचा कूट घालून परतावे. थोडावेळ झाकण ठेवून शिजू द्यावे.
रताळ्याचा किस तयार झाला कि त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालून दह्याबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Ratalyacha Kis, Potato hash, Indian sweet Potato hash, ratale kees
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment