भोपळा भाजी - Pumpkin Sabzi

Bhopla Bhaji in English

३ ते ४ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

साहित्य:
१/२ किलो लाल भोपळा, सोलून चौकोनी तुकडे करून
फोडणीसाठी- १ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/८ टिस्पून मेथी दाणे
२ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून किसलेला गूळ
चवीपुरते मिठ
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, मेथी दाणे, जिरे, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेला भोपळा घालून निट मिक्स करावे.
२) पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी. मिठ घालावे. भोपळा शिजण्यासाठी पातेल्यावर ठेवलेल्या थाळीत १/२ कप पाणी घालावे. या पाण्याने वाफ येऊन भोपळा शिजेल आणि करपणार नाही. जर साधे झाकण ठेवणार असाल तर पाण्याचा हबका मारावा.
३) भोपळा शिजत आला कि गूळ आणि गोडा मसाला घालावा. नारळ घालून मिक्स करावे. पोळीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) हि भाजी प्रेशरकूकरमध्येही करता येते. लहान कूकरमध्ये तेलाची फोडणी करून त्यात चिरलेला भोपळा फोडणीस घालावा. इतर सर्व साहित्य घालून थोडे पाणी घालावे. १ ते २ शिट्ट्या कराव्यात.

No comments:

Post a Comment