लसूण चटणी - Garlic Chutney

Garlic Chutney in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १/२ कप चटणी

साहित्य:
१० मोठ्या लसूण पाकळ्या किंवा १ मध्यम लसणीचा गड्डा
चवीपुरते मीठ (साधारण १/२ टीस्पून)
४ ते ५ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट (भरड)
१/२ टीस्पून आमचूर पावडर
१ टीस्पून लाल तिखट
२ टेस्पून तेल

कृती:
१) लसूण सोलून चिरून घ्यावी. खलबत्ता तयार ठेवावा. त्यात १ टीस्पून लाल तिखट घालून ठेवावे.
२) फोडणीसाठी लहान कढले घेऊन त्यात तेल गरम करावे. तेलात लसूण घालून लसूण थोडी ब्राऊन होईस्तोवर परतावी. हि फोडणी लाल तिखटावर घालावी आणि चमच्याने ढवळावे. (टीप १)
३) या मिश्रणात मीठ, शेंगदाणे कूट, आमचूर पावडर घालावी आणि चांगले कुटून काढावे.
हि चटणी पराठा, डोसा, किंवा नेहमीच्या जेवणात तोंडीलावणी म्हणून खाऊ शकतो.

टीप:
१) लाल तिखट फोडणीत घालू नये कारण तेल आणि कढले दोन्ही गरम असल्याने लाल तिखट करपण्याची शक्यता असते. म्हणून लाल तिखट खलबत्त्यात घालून त्यावर तेल ओतावे.

No comments:

Post a Comment