नारळाचे सार - Naralche Sar

Naralache Sar

coconut curry, naralache saar, naral kruti, coconut recipe, naralachi kadhi, kokan naral saar, maharashtrian curry recipe
साहित्य:
१ कप नारळाचे दूध
२ वाट्या आंबट ताक
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कढीपत्ता
१ चमचा तूप
जीरे
१ चमचा साखर
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) कढईत तूप गरम करून जीरे, मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
२) नंतर नारळाचे दूध घालावे. १ उकळी काढावी. ताक घालावे. ताक घातल्यावर उकळी येईस्तोवर ढवळावे.
३) उकळी आल्यावर चवीनुसार साखर आणि मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.


चकली

मसाले भात - Masalebhat

Masale Bhat in English

वाढणी: २ जणांसाठी

masale bhat, marathi masala bhat, maharashtrian masala rice, spice rice, vegetarian rice recipe, indian rice recipe
साहित्य:
पाउण कप बासमती/ साधा तांदूळ
वाटण : २ टिस्पून धणे, २ टिस्पून जिरे, १/२ कप कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लाल सुक्या मिरच्या हे सर्व मिक्सरवर वाटून घ्यावे.
६-७ काजू बी
दिड टिस्पून गोडा मसाला (काळा मसाला)
१ टिस्पून साखर
१ टिस्पून गूळ
चवीपुरते मीठ
२ टिस्पून तेल
१/४ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून हळद
तांदूळाच्या अडीचपट पाणी


कृती:
१) तांदूळ धुवून १० मिनीटे निथळत ठेवणे.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करून मोहोरी, हळद, काजू घालून तांदूळ परतून घ्यावे. तांदूळ परतताना दुसर्या गॅसवर २ कप पाणी गरम करत ठेवावे.
३) तांदूळ चांगले परतले गेल्यावर त्यात गरम केलेले पाणी घालावे. बारीक गॅसवर उकळी काढावी.
४) उकळी आल्यावर तयार केलेले वाटण, गोडा मसाला, चवीपुरते मीठ, साखर, गूळ घालावा. भांड्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ काढावी.
५) खाताना भातावर साजूक तूप आणि खवलेला ओला नारळ घ्यावा.

Labels:
Masala Rice, Masale Bhat, Maharashtrian masala Bhat recipe, Indian Spiced Rice recipe

शेव बटाटा पुरी - Sev Batata Puri

Shev Batata Puri in English

प्रांता-प्रांतात जशी जेवणाची पद्धत बदलते, तशी नाक्या-नाक्यावर पाणीपुरी, भेळपुरीची चव बदलत असते. अशाच अनेक पद्धतीतील मी बनवलेल्या "घरगुती आणि चविष्ठ" शेव बटाटा पुरीची हि कृती :

साहित्य:
टॉपिंग
१ मोठा कांदा
२ टोमॅटो
२ मध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे
पिवळी बारीक शेव (नायलॉन शेव)
बारीक चिरलेली कोथिंबीर
चटण्या

यात तीन प्रकारच्या चटण्या वापरल्या जातात. यातील लाल चटणी थोडी वेगळी आहे पण याने शेव बटाटा पुरीला मस्त स्वाद येतो.
हिरवी चटणी आणि आंबटगोड चटणी
आंबट गोड चटणी

लाल चटणी
१ ते दिड चमचा लाल तिखट
३-४ लसणीच्या पाकळ्या
वरून पेरण्यासाठी
काळे मिठ
चाट मसाला
पुर्‍यांसाठी साहित्य:
१ ते दिड वाटी कणिक (गव्हाचे पीठ)
२-३ चमचे तेल
मिठ
पाणी
तळण्यासाठी तेल

कृती:
१) पुरीची कृती :
शेव बटाटा पुरीसाठी लागणार पुर्‍या करायला अगदी सोप्या असतात. जर शक्य असेल तर आपण त्या घरीसुद्धा बनवू शकतो.


तेल भरपूर गरम करावे आणि कणकेच्या पिठाला त्याचे मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. २-३ मिनीटांनी कणिक घट्ट मळून घ्यावी.थोडावेळ पिठ झाकून ठेवावे. नतंर त्याचे गोटीएवढे गोळे करावे. त्याच्या छोट्या पुर्‍या लाटाव्यात. काटा-चमच्यातील काट्याने पुरीवर ५-६ वेळा टोचावे (फोटो) त्यामुळे पुर्‍या फुगणार नाहीत.हे करत असतानाच कढईत तेल तापत ठेवावे. पुर्‍या मध्यम गॅसवर तळाव्यात. एकदम गरम तेलात भराभर तळून काढू नयेत त्यामुळे पुर्‍या नरम पडतात आणि पुर्‍यांना आवश्यक कडकपणा येत नाही. तळलेल्या पुर्‍या थोडावेळ टीपकागदावर काढून ठेवाव्यात. लगेच डब्यात भरू नयेत.

२) चटण्या

* हिरवी चटणी आणि आंबटगोड चटणी
* लाल चटणी: लाल तिखट, लसूण आणि किंचीत पाणी घालून मिक्सरवर बारीक करावी.
३) सर्वात शेवटी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यावी. बटाटा व्यवस्थित कुस्करून घ्यावा.
४) शेव बटाटा पुरी बनवण्याचा क्रम : पुर्‍या, बटाटा, कांदा, लाल चटणी, आंबट गोड चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला, काळे मिठ, शेव, टोमॅटो, कोथिंबीर, थोडे जास्त तिखट हवे असल्यास हिरवी चटणी.

टीप:१) उरलेल्या पुर्‍या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. आठवडाभर छान टिकतात.
२) कणिक घट्टच मळली पाहिजे, जर कणिक सैल मळली गेली तर पुर्‍या नरम होतात.
३) पाणीपुरीच्या न फुगलेल्या पुर्‍या शेव बटाटा पुरीसाठी वापरता येतात.