Showing posts with label Coconut. Show all posts
Showing posts with label Coconut. Show all posts

मसाल्याची गोळी - Masalyachi Goli

Masala Goli in English

वेळ: १५ मिनिटे
१० ते १२ गोळ्या

coconut masala, naralache vatan, vatanacha masalaसाहित्य:
१ कप ओलं खोबरं किंवा सुके किसलेले खोबरे
१ टिस्पून तेल
२ टिस्पून लाल तिखट किंवा ६-७ लाल सुक्या मिरच्या
१ टिस्पून बडिशेप
७ ते ८ मोठ्या लसणीच्या पाकळ्या
चवीपुरते मिठ
१ टिस्पून धणेपूड

कृती:
१) १ टिस्पून तेल गरम करून त्यात ओलं खोबरं किंवा सुकं किसलेलं खोबरं खरपूस भाजून घ्यावे. जर ओलं खोबरं वापरत असाल तर चांगले सुकेस्तोवर परतावे नाहीतर टिकत नाही.
२) नंतर यात बडीशेप, लसूण, धणेपूड, लाल तिखट/ लाल मिरच्या आणि मिठ घालून एकदम बारीक वाटून घ्यावे. पाणी घालू नये म्हणजे आठ-पंधरा दिवस सहज टिकतील.
याच्या १ टेस्पूनच्या गोळ्या बनवून ठेवाव्यात. लागेल तसे भाजी आमटीमध्ये वापरता येते तसेच चवही छान येते.

घावन घाटले - Ghavan Ghatle

Ghavan Ghatle in English



चकलीच्या सर्व वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी खास रेसिपीज - इथे क्लिक करा



काही दिवसातच गौरींचे आगमन होईल. इतर गोड पदार्थांबरोबरच घावन आणि घाटले हा पारंपारिक पदार्थ गौरींना नैवेद्य म्हणून दाखवायची प्रथा आहे. त्याची कृती पुढील प्रमाणे. नक्की करून पहा!!



घावनाचे साहित्य आणि कृती



वेळ: पूर्वतयारी- ५ मिनिटे | पाकृसाठी - २५ मिनिटे

वाढणी: ८ ते ९ मध्यम घावने

घावन घाटले, gauri poojan naivedya, gaurincha naivedya, ghavan ghatleसाहित्य:

१ कप तांदुळाची पिठी

२ कप दुध / पाणी

चिमूटभर मीठ

घावन बनवण्यासाठी तूप



कृती:

१) तांदुळाचे पीठ, दुध, आणि मीठ एका वाडग्यात मिक्स करावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२) नॉनस्टिक तवा मिडीयम फ्लेमवर गरम करावा. तवा गरम झाला कि थोडे तूप घालावे. आणि त्यावर डावभर मिश्रण घालून पसरावे. झाकण ठेवून एक बाजू किमान २ ते ३ मिनिटे शिजू द्यावी. बाजू पालटून झाकण ठेवून दुसरी बाजू शिजवावी. जर असे वाटले कि पूर्ण शिजले नाहीये तर अजून थोडावेळ झाकण ठेवून शिजवावे.

तयार घावन घाटल्याबरोबर सर्व्ह करावे.



टीप:

१) गोड घावन आवडत असल्यास मिश्रणात थोडा गुळ घालावा.



==================================



घाटल्याचे साहित्य आणि कृती:




वेळ: १० मिनिटे

दीड कप (साधारण ३ जणांसाठी)



घावन घाटले, gauri poojan naivedya, gaurincha naivedya, ghavan ghatleसाहित्य:

दीड कप नारळाचे घट्ट दुध

१ टेस्पून तांदूळ पीठ

२ ते ३ चिमटी वेलची पूड

गूळ, गरजेनुसार (मी २ टेस्पून गुळ वापरला होता)



कृती:

१) सर्व साहित्य एकत्र करा. तांदूळ पिठाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची दक्षता घ्या.

२) तयार मिश्रण लहान पातेल्यात घ्या. मंद आचेवर ढवळून शिजवा. मिश्रण दाटसर झाले कि गॅस बंद करा.

तयार घाटले गरम घावानाबरोबर सर्व्ह करा.



टीप:

१) घाटल्यामध्ये काजू पिस्त्याचे काप घातले तरीही चालतील.

२) गुळाचे प्रमाण गरजेनुसार कमी-जास्त करावे.

रवा नारळाचे लाडू - Rava naralache ladu

Rava Coconut laddu in English

२२ ते २४ मध्यम लाडू
वेळ: ३० मिनीटे (मिश्रण आळायला लागणारा वेळ न धरता)

rava laddu, rava recipes, laddu recipes, rava naralache ladu, coconut laddu, semolina ladoo, semolina laddu, semolina coconut ladduसाहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ
दिड कप साखर
१ कप पाणी
३ ते ४ टेस्पून तूप
१/२ टिस्पून वेलची पूड
२५ बेदाणे

कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ मिनीटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही. [रंग बदलेस्तोवर भाजू नये, अगदी हलकेच भाजावे. नंतर परत रवा भाजायचा आहे.]
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेस्तोवर (१० मिनीटे) तसेच ठेवावे.
३) कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने रवा आणि तूपाचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि साधारण ३ ते ४ मिनीटांनी पाकाचा थेंब पहिले बोट आणि अंगठा यात पकडून उघडझाप करावी. जर एक तार दिसली कि पाक तयार आहे असे समजावे [हि तार अगदी सेकंदभरच दिसेल]. किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले कि ३ ते ४ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.

टीपा:
१) हे लाडू फार काळ टिकत नाहीत, जास्तीत जास्त ७-८ दिवस टिकतील. उष्ण आणि दमट हवामानात ३-४ दिवसच टिकतील. अशावेळी २-३ दिवसांनी लाडू फ्रिजमध्ये ठेवावे.
२) रवा साधारण ३ प्रकारचा मिळतो. जाड (coarse), बारीक (fine), एकदम बारीक (super fine). वरील रेसिपीसाठी बारीक रवा वापरावा. जाड रव्यामुळे लाडू चरचरीत लागतात. एकदम बारीक रवा पिठासारखाच दिसतो त्यामुळे रवा लाडूसाठी योग्य नसतो.
३) लाडूचे मिश्रण जर कोरडे झाले तर एकतारी पाक जरा जास्त आटल्याने दोन तारी किंवा तीन तारी झाला असावा. अशावेळी १/२ कप पाणी + ३ टेस्पून साखर असे मिश्रण उकळवावे. ३ ते ४ मिनीटे उकळवून पाक लाडू मिश्रणावर ओतावा. मिक्स करून मिश्रण आळले कि लाडू करावे.
४) आवडीनुसार सुका मेव्याचे तुकडे घालावे.
५) नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यावा. करवंटीकडील काळपट भाग घेऊ नये.

नारळी भात - Narali Bhat

Narali Bhat in English

वेळ: साधारण ४५ ते ५० मिनीटे(पूर्वतयारी: २० ते ३० मिनीटे । पाककृतीस लागणारा वेळ: २५ मिनीटे)
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

coconut rice, Indian coconut recipes, vegetarian recipes, coconut jaggery rice, naralache padarth, coconut sweets, Indian sweets, Indian curry recipes, Indian vegetarian foodसाहित्य:
३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे

कृती:
१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७) झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.

टीप्स:
१) गूळ-नारळ-भात यांचे मिश्रण शिजवताना गूळ वितळल्याने सुरूवातीला ते पातळ होते. काहीवेळ शिजवल्यावर ते आळत जाईल. तसेच नारळीभात तयार झाल्यावर शेवटची काही मिनीटे झाकण न ठेवता शिजवावे म्हणजे अधिकचा ओलसरपणा निघून जाईल.
२) जर नारळीभात खुप गोड नको असेल तर गूळाचे प्रमाण १ कप ऐवजी पाऊण कप वापरा.
३) जर नारळीभात तयार झाल्या झाल्या लगेच चव पाहिली तर प्रचंड गोड लागेल, पण काही कालावधीनंतर गुळाचा पाक भातात मुरल्याने गोडपणा काहीप्रमाणात कमी होतो.
४) तांदूळ परफेक्ट शिजवावा. कमी शिजलेल्या भाताची शिते, गूळाच्या संपर्कात आल्यामुळे कडकडीत होतात. तसेच जास्त शिजलेल्या भाताचा, गूळ आणि नारळ घालून शिजवल्यावर गोळा होतो आणि शिते आख्खी राहात नाहीत.
५) भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो.

Labels:
coconut rice, narali bhat, narali paurnima, raksha bandhan

नारळाच्या पोळ्या - Naralachya Polya

Coconut Roti in English

५ ते ६ लहान पोळ्या
वेळ: ३० मिनीटे (सारण तयार असल्यास)

Naralachya Polya, naral poli, coconut jaggery rotiसाहित्य:
दिड कप ताजा खवलेला नारळ
पाऊण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलचीपूड
१/४ कप गव्हाचे पिठ
१/४ कप मैदा
चिमूटभर मिठ
२ टिस्पून तेल
२ टेस्पून तूप

कृती:
१) नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर घट्टसर होईस्तोवर (साधारण १० ते १५ मिनीटे) ढवळावे, वेलचीपूड घालावी. गार झाले कि बंद डब्यात ठेवून २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवावे (टीप १).
२) मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करावे. २ टिस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. १ चिमूटभर मिठ घालून ढवळावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. १/२ तास झाकून ठेवावे.
३) नारळाच्या मिश्रणाचे दिड इंचाचे गोळे करावे. साधारण ५ ते ६ गोळे होतील. तेवढेच भिजवलेल्या कणकेचे गोळे करावे.
४) कणकेच्या लाटीची पुरी लाटावी. मधे नारळाचा गोळा ठेवून पुरीच्या सर्व बाजू एकत्र आणून बंद करावे. थोडा मैदा भुरभूरवून पोळी लाटावी.
५) तवा गरम करून तूपावर खरपूस भाजून घ्याव्यात. गॅस मध्यम ठेवावा.
जरा कोमट झाल्या कि खाव्यात. गार झाल्यावरही छान लागतात तसेच ३-४ दिवस टिकतात.

टीप:
१) मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्याने घट्ट बनते, पोळी लाटताना सोपे पडते.
२) जर कधी उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्याही पोळ्या बनवता येतात.

Labels:
Coconut Roti, Naralachya polya, coconut recipe, coconut sweets.

तळलेले मोदक - Fried Modak

Fried Modak in Marathi

वेळ: ४० मिनीटे
साधारण १० लहान आकाराचे मोदक

talalele modak, moduk recipe, Ganeshji prasad, sweets, Ganpati prasad fried modakसाहित्य:
१/२ कप खिरापत
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
तळण्यासाठी तेल/ तूप
१ टीस्पून दूध
ओल्या नारळाचे सारण भरायचे असेल तर ओल्या नारळाच्या करंज्यांचे सारण वापरावे.

कृती:

१) मैदा आणि रव एकत्र करून घ्यावा. २ चमचे तेल कडकडीत गरम करून मोहन घालावे. किंचीत मिठ घालून हाताने मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे.
२) अर्ध्या तासाने पिठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हानाने मुखर्‍या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात १ चमचा सारण भरावे. सर्व मुखर्‍या एकत्र करून कळी बनवावी आणि १ थेंब दुधाचं बोट घेवून कळी निट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावे.

टीप:
१) पिठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली कळी बर्‍याचदा तेलात उघडली जाते आणि सारण बाहेर येते, नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून थोडे दुध लावल्यास कळी पक्की बंद होते. फक्त अगदी कणच दुध वापरावे.
२) मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात.

Labels: Fried modak, talalelel modak, Ganpati Prasad

नारळाची चटणी - Coconut Chutney

Coconut Chutney in English

वेळ: ५ मिनीटे
साधारण १ कप
south Indian coconut chutney, chutney for Idli, Coconut chutney recipeसाहित्य:
१ कप ताजा खवलेला नारळ
१/४ कप चण्याचं डाळं
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून साखर
१ हिरवी मिरची
फोडणीसाठी
१/२ टिस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी
१/२ टिस्पून उडीद डाळ
१/८ टिस्पून हिंग
५ ते ७ कढीपत्ता पाने
१ सुकी लाल मिरची
१/८ आले पेस्ट

कृती:
१) नारळ, डाळं, हिरवी मिरची, मिठ आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात गरजेपुरते पाणी घालून एकजीव वाटून घ्या. हे मिश्रण एका लहान वाडग्यात काढावे.
२) कढले गरम करून त्यात तेल घालावे. तेल तापले कि त्यात मोहोरी आणि उडीद डाळ घाला. उडीद डाळ लालसर झाली कि हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, आणि आलेपेस्ट घालून फोडणी करून घ्या. हे मिश्रण नारळाच्या मिश्रणावर घाला. मिक्स करून हि चटणी इडली, मेदू वडा, मसाला डोसा, उत्तपा, आप्पे आणि इतर दाक्षिणात्य पदार्थांबरोबर सर्व्ह करा.

टीप:
१) वरील चटणीची रेसिपी उडीपी हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीची आहे. आपल्या आवडीनुसार यामध्ये चिंच, लिंबू, दही, जिरे असे आवडीप्रमाणे घालावे.
२) चटणी प्रकार २

Labels:
coconut chutney, South Indian Chutney

अळिव लाडू - Alivache ladu

Alivache ladu in English

वाढणी: साधारण ६ ते ७ मध्यम लाडू

Aliv Ladu, paushtik ladu, laddu recipe, Marathi Alivache Ladu
साहित्य:
१/८ कप अळीव (अळीव कुठे मिळतील? - टीप १)
१/४ कप दूध
३/४ कप गूळ
१ कप ओला नारळ

कृती:
१) अळीव गार दुधात ३-४ तास भिजत घालावेत. ३ ते ४ तासात अळीव छान फुगून येतील.
२) भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करून कढईत मध्यम आचेवर शिजवत ठेवावेत. मिश्रण कडेने सुटू लागले आणि मिश्रण दाटसर झाले कि लाडू वळावेत.

टीप
१) अळीव भारतामध्ये किराणा मालाच्या दुकानात मिळू शकतील. भारताबाहेर इंडीयन स्टोअर्समध्ये मिळेल.

Labels:
Healthy laddus, Aliv Ladu, Alivache Laadu

नारळाचे लाडू - Naralache Ladu

Coconut ladu in English

सोपे आणि पटकन होणारे लाडू..

वाढणी : साधारण ८ छोटे लाडू

coconut Laddu, laddu dessert recipe, sweets recipe, nariyal ke laddu, naralache ladu, coconut recipe, Indian laddu recipe, sweets, quick and easyसाहित्य:
२ कप खवलेला ताजा नारळ
१/२ कप साखर
१/२ कप दूध
१/२ टिस्पून वेलचीपूड
२ टेस्पून बदामाचे काप

कृती:
१) एका पातेल्यात खवलेला नारळ आणि दूध एकत्र करावे. मध्यम आचेवर उकळत ठेवावे.
२) घट्टसर होत आले कि साखर घालावी. पातेल्याच्या तळाला नारळ चिकटू नये म्हणून ढवळत राहावे.
३) वेलचीपूड आणि बदामाचे काप घालावे. मिश्रण घट्टसर होत आले कि गॅस बंद करावा आणि पातेले गॅसवरून उतरवावे.
४) मिश्रण थोडे कोमटसर होवू द्यावे. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत.

टीप:
१) हे लाडू नरमसर होतात. जर थोडा घट्टपणा हवा असेल तर थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावेत आणि मग खावेत.

Labels: laddu recipe, coconut laddu recipe, naralache ladu, naral ladu

उकडीचे मोदक - Ukadiche Modak

Modak in English

Ukadiche modak is a sweet dumpling very much popular in Maharashtra and south India. Modak can be fried or steamed. Ukadiche Modak is a marathi word which means "Steamed modak". The filling is made of fresh coconut and jaggery, the cover is made of Rice flour.
Modak has a special importance in the worship of the Hindu elephant god, Ganesh. Modak is believed to be his favorite food and Ganesh worship ceremony pooja concludes with offering of 21 modaks to the deity.

ukadiche modak, modak, maharashtrian modak, kokan recipe, coconut recipe, konkani recipe, modakam, heart healthy, diet, mexican, chineseसाहित्य:
१ मोठा नारळ
किसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा. (उदाहरणार्थ २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ).पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळावे, काहीवेळा कालथ्याच्या अग्रभागाने मिक्स केल्यास पिठाचे गोळे राहतात. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी.
६) जर मोदकपात्र उपलब्ध नसेल तर मोदकांना वाफवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात ३-४ भांडी पाणी उकळावे. मोठे भोक असलेल्या स्टीलच्या किंवा अल्युमिनीयमच्या चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. एकावर एक मोदक ठेवू नयेत. त्यामुळे मोदक फुटण्याचा संभव असतो. जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून १२-१५ मिनीटे वाफ काढावी.
७) जर मोदक केल्यावर तांदूळाची उकड उरली असेल तर त्यात मिरची, मिठ, जिरे, हिंग, हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर घालून मळून घ्यावी आणि त्याच्या गोल छोट्या चपट्या पुर्या करून शेवटचे मोदक वाफवताना त्यातच या निवगर्या वाफवून घ्याव्यात.
गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.

टीप:
१) आवडत असल्यास सारणात काजू-बदामाचे पातळ काप घालू शकतो.

ukadiche modak, modak, maharashtrian modak, kokan recipe, coconut recipe, konkani recipe, modakam ukadiche modak, modak, maharashtrian modak, kokan recipe, coconut recipe, konkani recipe, modakamukadiche modak, modak, maharashtrian modak, kokan recipe, coconut recipe, konkani recipe, modakamukadiche modak, modak, maharashtrian modak, kokan recipe, coconut recipe, konkani recipe, modakam

चकली

Labels:
Sweet Dumplings, Marathi Modak, Ganapati Naivadya Sweet Coconut, Steamed Dumpling, Ganesh Chaturthi, Ganeshostav, Naivedyam, Indian Food, Indian Sweets

नारळाच्या वड्या - Naralipak

नारळाच्या वड्या

वाढणी : २० ते २५ वड्या

coconut burfi, naralipak, naralachya vadya

साहित्य:
१ नारळ
३५० ग्रॅम साखर
तूप
वेलची पूड

कृती :
१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये.
२) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.
३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा.
४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर ढवळत राहावे.
५) छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.
६) एका परातीला तूप लावून घ्यावे आणि मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान पसरावे. अर्ध्या इंचाचा थर करावा.
७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. नाहीतर मिश्रण थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत.
८) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.

टिप:
१) वड्यांना केशरी रंग हवा असल्यास थोडे केशर किंवा खायचा केशरी रंग घालू शकतो.
२) जर आंब्याचा रस उपलब्ध असेल तर साखर घालताना थोडी साखर कमी करून थोडा आंबा रस घालावा. नारळ आणि आंबा एकत्र स्वाद अप्रतिम लागतो.

नारळाच्या वड्यांची रेसिपी मनोगत दिवाळी अंक २००७ मध्ये छापून आली होती.

नारळाचे सार - Naralche Sar

Naralache Sar

coconut curry, naralache saar, naral kruti, coconut recipe, naralachi kadhi, kokan naral saar, maharashtrian curry recipe
साहित्य:
१ कप नारळाचे दूध
२ वाट्या आंबट ताक
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कढीपत्ता
१ चमचा तूप
जीरे
१ चमचा साखर
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) कढईत तूप गरम करून जीरे, मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
२) नंतर नारळाचे दूध घालावे. १ उकळी काढावी. ताक घालावे. ताक घातल्यावर उकळी येईस्तोवर ढवळावे.
३) उकळी आल्यावर चवीनुसार साखर आणि मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.


चकली