Kadhi gole (English version)
वाढणी : 12 ते १५ गोळे (१ इंच आकाराचे) आणि ४ वाट्या घट्टसर कढ़ी
साहित्य:
गोळ्यांसाठी :
पाउण वाटी चणाडाळ
१ चमचा आलेलसूण पेस्ट
१ लहान चमचा मिरची पेस्ट
१/२ चमचा हिंग
१ लहान चमचा हळद
१ लहान चमचा जिरेपूड
मीठ
कढीसाठी :
२ वाट्या आंबट दही
१ चमचा भरून चणापिठ
फोडणीसाठी: २ चमचे तेल/तूप, मोहोरी, जिरे, १/२ चमचा हिंग,१ चमचा हळद
५-६ कढीपत्ता पाने
१/२ लहान चमचा आलेपेस्ट
२ लसूण पाकळ्या (ऑप्शनल)
२ हिरव्या मिरच्या
चिरलेली कोथिंबीर
१/२ चमचा साखर
मीठ
कृती:
पद्धत १
१) चणाडाळ ३-४ तास भिजत घालावी. चणाडाळ भिजली कि थोडावेळ ती निथळत ठेवावी. त्यातील पाणी निघून गेले कि त्यात आलेलसूण पेस्ट, मिरचीपेस्ट, हिंग, हळद, जिरेपूड, मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. मिक्सरमध्ये मिश्रण वाटताना पाणी घालू नये नाहीतर गोळे एकसंध राहणार नाहीत. या मिश्रणाचे एक इंचाचे घट्टा गोळे करून घ्यावे. आवश्यक तेवढा जोर देऊन गोळे घट्ट करावेत जेणेकरून ते कढीत फुटणार नाहीत.
२) दह्याचे पातळसर ताक करून घ्यावे. त्यात चणापिठ गुठळी न राहता मिक्स करावे. पातेल्यात तूप किंवा तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, आलेपेस्ट घालून फोडणी करावी. मिरच्यांचे तुकडे घालावे. जर लसूण आवडत असेल तर २ लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्यात ताक घालावे. आणि मध्यम आचेवर उकळी येईस्तोवर ढवळत राहावे. चवीपुरते मिठ आणि थोडीशी साखर घालावी.
३) कढीला उकळी आली कि आधी एक गोळा कढीत घालून बघावा जर तो फुटला नाही तर एक एक करून हळू हळू गोळे आत सोडावेत. शेवटचा गोळा घातल्यानंतर ५ मिनीटे कढीत शिजू द्यावेत. गरम गरम खायला घ्यावेत.
पद्धत २
जर वरील कृती कठीण वाटत असेल तर पुढीलप्रमाणेसुद्धा कढीगोळे बनवता येतात.
वरती दिलेल्या कृतीत गोळे थेट कढीत घातले आहेत. असे न करता एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात हळू हळू एकेक गोळा सोडावा. आणि शेवटचा गोळा घातल्यानंतर ५ मिनीटे उकळत ठेवून गोळे शिजवावे. ते गोळे बाहेर काढून तयार कढीमध्ये घालावेत. २ मिनीटे कढी उकळावी.
टीप:
१) कढी बनवताना थोडी जास्त बनवावी कारण गोळे घातल्यावर गोळे कढी शोषून घेतात.
Labels:
Kadhi Gole, Kadhi Gola Recipe, Golyachi Kadhi, Gola Kadhi, Maharashtrian Recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment