मेतकूट - Metkut

Metkut (English Version)

मेतकूट हा मराठमोळा चविष्ठ पदार्थ !! मऊभात तूप आणि मेतकूट याची सर तर कशालाच नाही. दह्यात मेतकूट घालून तोंडीलावणी म्हणूनही खुप छान लागते. अशा या रूचकर मेतकूटाची ही कृती

metkut recipe, metakut recipe, maharashtrian side dish recipe, healthy food, low calorie food
साहित्य:
२ वाट्या चणाडाळ
१/२ वाटी उडीद डाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी तांदूळ
१/४ वाटी गहू
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
१ चमचा हिंग
१ चमचा सुंठ पावडर
१ चमचा लाल मोहोरी

कृती:
१) सर्व डाळी, गहू, तांदूळ मध्यम आचेवर वेगवेगळे व कोरडेच भाजावे.
२) लाल मोहोरी मूग डाळीबरोबर भाजावी.
३) हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर एकत्र करावी. कढई गरम करावी. गॅस बंद करावा आणि हे सर्व जिन्नस थोडे शेकवून काढावे.
४) भाजलेल्या डाळी, तांदूळ, गहू, मोहोरी एकत्र अगदी बारीक दळून आणावे. हळद, हिंग, तिखट, सुंठ पावडर यांचे मिश्रण दळून आणलेल्या पिठात निट मिक्स करावे.

Labels:
Roast Dal and Spices Mixture, Maharashtrian spices, traditional spices

No comments:

Post a Comment