Aloo Mungodi Chat in English
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: ४० मिनीटे (मूग भिजलेले असल्यास)
साहित्य:
मुगभजीसाठी:::
१/२ कप हिरवी मुगडाळ (सालासकट)
३-४ हिरव्या मिरच्या, ४ लसूण पाकळ्या
१/२ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
बटाटा:::
२ मध्यम बटाटे, उकडून, १ टिस्पून बटर, चवीपुरते मिठ, १ टिस्पून लिंबाचा रस
लाल चटणी:::
लाल मिरच्या भिजवण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मी लाल चटणी पुढील प्रमाणे केली
२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट, १ टिस्पून धणेपूड, २-३ टेस्पून पाणी
इतर साहित्य:::
२ टेस्पून हिरवी चटणी
१/४ कप चिंचेची चटणी
२ टिस्पून चाट मसाला
१ टिस्पून जिरेपूड
१/२ कप दही
१/२ टिस्पून काळे मिठ
साधे मिठ चवीनुसार
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप बारीक शेव, १/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ टिस्पून लाल तिखट
कृती:
१) चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी तयार ठेवावी. दही फेटून घ्यावे.
२) मुगभजीसाठी हिरवी मुगडाळ ३ तास भिजत घालावी. त्यातील पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये भिजवलेली हिरवी मुगडाळ, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, लाल तिखट, हळद, जिरेपूड, चवीपुरते मिठ घालून बारीक करावे. तेल गरम करून त्यात छोट्या भजी तळून घ्याव्यात.
३) उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत. एक पॅन गरम करून बटर घालावे त्यात बटाट्याच्या फोडी घालून परतावे. गॅस मध्यम ठेवावा. मिठ घालावे आणि गॅस बंद करून लिंबाचा रस घालावा.
४) प्लेटमध्ये आधी भज्या घालाव्यात त्यावर परतलेले बटाटे, २ चमचे दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, लाल चटणी, अजून थोडे दही, चाट मसाला, जिरेपूड, काळे मिठ, साधे मिठ, लाल तिखट घालावे. शेवटी कोथिंबीर, बारीक शेव घालून सजवावे.
Labels:
Dahi Chat, Pakoda Chat, Moong Bhajji Chat, Bombay chat food, Aloo Chat
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment