Pindi Chhole in English
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
३/४ कप काबुली चणे
३ टेस्पून + २ टिस्पून तेल
१/४ कप कांदा, बारीक चिरून
२ टिस्पून आलेपेस्ट
२ टिस्पून लसूणपेस्ट
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
दिड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून हळद
२ टिस्पून जिरं
२ टिस्पून अनारदाणा
१ मध्यम टॉमेटो
१ टिस्पून गरम मसाला
चवीनुसार मिठ
१ लाल मिरची
सजावटीसाठी
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
कांद्याच्या चकत्या
छोले आणि भटुरे रेसिपी
कृती:
१) पाउण कप काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवावेत. भिजवलेले चणे कूकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवावेत. चणे छान मऊसर शिजवावेत. खुप जास्तही शिजवू नयेत, नाहीतर चणे फुटू शकतात. चणे शिजवताना मिठ घालून शिजवावेत. उरलेले पाणी ठेवून द्यावे.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये २ टिस्पून जिरं, मध्यम आचेवर कोरडेच भाजावे. नंतर २ टिस्पून अनारदाणा थोडावेळ भाजावे. हे दोन्ही जिन्नस थोडे थंड झाले कि खलबत्त्यात घालून पूड करून घ्यावी.
३) नॉनस्टिक पॅनमध्ये ३ टेस्पून तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट घालावे. नंतर त्यात आलेलसूण पेस्ट घालून थोडा वेळ परतावे. गॅस मध्यम करावा आणि चिरलेला कांदा घालावा. तेल सुटेस्तोवर परतावे.
४) कांदा परतला कि त्यात धणे-जिरेपूड, आमचूर पावडर घालावी. १/४ कप शिजवलेल्या चण्याचे उरलेले पाणी घालावी. मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी.
५) नंतर शिजवलेले चणे घालून हळूहळू मिक्स करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालावे. मिठ आणि आवश्यक तेवढी जिरे-अनारदाणा पावडर घालावी.
६) टॉमेटोचे मोठे चौकोनी तुकडे करून घालावेत. गरज वाटल्यास लाल तिखट किंवा कमी वाटत असलेला जिन्नस घालावा. मंद आचेवर २-३ मिनीटे वाफ काढावी.
७) सर्व्ह करताना, छोले सर्व्हींग प्लेटमध्ये काढावेत. एका छोट्या कढल्यात १ ते २ टिस्पून तेल गरम करावे. त्यात लाल मिरची घालून हि फोडणी लगेच भाजीवर ओतावी. वरून कोथिंबीर आणि कांद्याच्या चकत्या घालून सर्व्ह करावे.
नान, रोटी किंवा अगदी ब्रेडबरोबरही हे छोले मस्त लागतात.
Labels:
Pindi Chole, Chole Masala, Chana Masala, Punjabi Chole
पिंडी छोले - Pindi Chole
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment