Corn Paneer Toast in English
वाढणी: ४ ते ५ ब्रेड
साहित्य:
३/४ कप मक्याचे दाणे (उकडलेले)
१/४ कप पनीर (छोटे तुकडे)
४ व्हाईट ब्रेड स्लाईस
१ टिस्पून बटर
१/४ कप + २ टेस्पून दुध
१ हिरवी मिरची बारीक चिरून
१/२ टिस्पून कॉर्न फ्लोअर
आवडीनुसार किसलेले चिज
चवीनुसार मिरपूड आणि मिठ
कृती:
१) पॅन गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले कि त्यात हिरवी मिरची घालावी. उकडलेले मक्याचे दाणे थोडावेळ परतून घ्यावे.
२) नंतर परतलेले मक्याचे दाणे बाजूला काढून ठेवावे. नंतर त्याच पॅनमध्ये पाव कप दुध घालून ढवळावे. गॅस मंद करून ठेवावा. २ टेस्पून गार दुधात थोडे कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे व गरम दुधात घालावे. मध्यम आचेवर उकळू द्यावे, हळूहळू घट्टसर सॉस तयार होईल. सॉस घट्ट होताना ढवळत राहावे, गुठळी राहू देवू नये. यात परतलेले मक्याचे दाणे घालावेत व पनीर घालावे, निट मिक्स करावेत. गॅस बंद करून या मिश्रणात थोडे मिठ घालावे.
३) ओव्हन ३५० F वर प्रिहीट करावे.
४) ब्रेड स्लाईसवर मक्याचे तयार मिश्रण लावावे. वरून आवडीनुसार चिज घालावे. ५ मिनीटे बेक करावे. ब्रेडवरील चिज वितळले आणि ब्रेड जरा क्रिस्पी झाला कि बाहेर काढावे. थोडे मिठ-मिरपूड भुरभूरवावी. टॉमेटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावे. हे टोस्ट हिरव्या चटणीबरोबरही खुप छान लागतो.
Labels:
Corn Toast, Corn Recipes, Corn Snacks
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment