पाइनॅपल रायता - Pineapple Raita

Pineapple Raita in English

वाढणी : २ जणांसाठी

pineapple raita, yogurt raita recipe, healthy raita, Pineapple salad, Pineapple yogurt saladसाहित्य:
३/४ कप अननस लहान फोडी
१ कप दही
१/८ टिस्पून जिरेपूड
चवीपुरते मिठ
१ टेस्पून साखर
१ लहान हिरवी मिरची (ऐच्छिक)
१ टिस्पून कोथिंबीर
१ चेरी सजावटीसाठी (ऐच्छिक)
४ ते ५ अननसाचे लहान तुकडे सजावटीसाठी

कृती:
१) दही चांगले फेटून घ्या. त्यात साखर आणि थोडे मिठ घालावे. जर थोडा तिखटपणा हवा असेल तरच मिरची घालावी.
२) फेटलेल्या दह्यात अननसाच्या फोडी घालाव्यात. चव पाहून साखर मिठ आवडीनुसार वाढवावे, मिक्स करावे. सर्व्हींग बोलमध्ये घालून त्यावर जिरेपूड भुरभूरावी. नंतर अननसाच्या फोडी, कोथिंबीर आणि चेरीने सजवावे. थोडावेळ थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
१) जर फक्त गोड रायते हवे असेल तर हिरवी मिरची वगळावी.
२) काही जणांना गोड रायते आवडते. त्यांनी आवडीनुसार साखर वाढवावी.
३) किंचीत मिरपूड घातल्याने छान स्वाद येतो. फक्त ती सर्व्ह करण्याआधी दह्यात मिसळू नये, त्यामुळे दह्याचा रंग बदलेल. म्हणून जिरपूडसारखीच वरून भुरभूरावी.

No comments:

Post a Comment