साधारण १५ ते २० मध्यम पुर्या
साहित्य:
१ कप गव्हाचे पिठ
१ टेस्पून बेसन पिठ
१ टेस्पून रवा
१/२ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
१ टेस्पून तेल
तेल तळणीसाठी
ओला, पिळून घेतलेला कपडा, मळलेला गोळा झाकण्यासाठी
कृती:
१) एका वाडग्यात गव्हाचे पिठ, बेसन पिठ, रवा, आणि मिठ एकत्र मिक्स करावे. कढल्यात १ टेस्पून तेल गरम करून, गरम तेलाचे मोहन मिक्स केलेल्या पिठांत घालावे. दोन मिनीटे थांबावे.
२) मिसळलेल्या पिठात पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. १० मिनीटे मळलेली कणिक झाकून ठेवावी.
३) १० मिनीटांनी परत एकदा भिजवलेली कणिक मळून घ्यावी. नंतर कणकेचे २ सेमीचे एकसारखे गोळे करून घ्यावे. तुमच्या आवडीनुसार मोठे गोळे करून मोठ्या पुर्यासुद्धा करता येतील, पण फक्त गोळे एकसारखे करा म्हणजे पुर्यांचा आकार एकसारखा येईल.
४) तेल तापत ठेवावे. त्यावेळात पुर्या लाटाव्यात. जमतील तेवढ्या पुर्या लाटून त्यावर ओला कपडा ठेवावा म्हणजे पुर्या सुकणार नाहीत. पुर्या खुप जाड किंवा पातळ नसाव्यात. जाडी साधारण १ mm असावी. पुर्या लाटून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
Labels:
Puri, Shrikhand Puri, Poori bhaji
No comments:
Post a Comment