साहित्य:
३ मध्यम बटाटे
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून उडीद डाळ (ऐच्छिक)
१/२ टिस्पून आलेपेस्ट
४ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
४ ते ५ कढीपत्ता पाने
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मिठ
१ टिस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)
२ टेस्पून कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) बटाटे उकडून आणि सोलून घ्यावेत. बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
२) कढई किंवा पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, घालून फोडणी करावी. उडीद डाळ घालून ती गुलाबीसर होईपर्यंत परतावी (साधारण १५ सेकंद).
३) नंतर आलेपेस्ट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून काहीवेळ परतावे. नंतर कोथिंबीर घालून ५ ते १० सेकंद परतावे. आणि बटाट्याच्या फोडी घालाव्यात. निट परतावे.
४) चवीपुरते मिठ घालावे. पॅनवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनीटे मध्यम आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे. लिंबाचा रस घालून मिक्स करावे. कोथिंबीर घालून सजवावे. गरम गरम बटाट्याची भाजी, पुरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) तिखटपणासाठी गरजेनुसार मिरच्या वापराव्यात.
२) काही जणांना बटाट्याच्या फोडी जरा मॅश केलेल्या आवडतात, अशावेळी भाजीला वाफ काढायच्या आधी (क्र.४) मॅशरने बटाटे थोडे मॅश करून घ्यावेत. यामुळे भाजी छान मिळून येते.
Labels:
Potato Sabzi, Suki Bhaji, Batatyachi Suki Bhaji, Pravasi Bhaji
No comments:
Post a Comment