पावभाजीचा पाव - How to make bread

Pavbhaji Bread in English

साधारण १० ते १२ पाव

bread roll, dinner roll, how to make bread, easy bread recipe
साहित्य:
३ कप सेल्फ राईजिंग फ्लोर किंवा मैदा (टीप १)
२ टिस्पून ड्राय यिस्ट
दिड टिस्पून साखर
१ टिस्पून मिठ (टीप)
४ टेस्पून तेल
दिड ते पावणेदोन कप कोमट पाणी
२ टेस्पून दूध

homemade bread, bread recipe, home baked bread
कृती:
१) एका लहान वाडग्यात १/२ कप कोमट पाणी घ्यावे. पाणी खुप गरम नसावे आणि अगदी गुळमूळीत कोमटही नको. या पाण्यात दिड टिस्पून साखर घालावी. थोडे ढवळून ड्राय यिस्ट घालून मिक्स करावे. यिस्ट activate होण्यासाठी ५ ते १० मिनीटे झाकून ठेवावे. १० मिनीटांनी जर मिश्रण फेसाळले असेल तर समजावे कि यिस्ट activate झालेय.
२) मोठ्या वाडग्यात ३ कप पिठ, यिस्टचे पाणी, मिठ आणि पाणी घालून एकदम मऊसर मळून घ्यावे. २ ते ३ मिनीटे थोडे कोरडे पिठ भुरभूरवून मळावे छान मळून घ्यावे. नंतर तेल घालून ५ मिनीटे मळावे. प्लेन सरफेसचा गोळा करून वाडग्यात ठेवावा. वरून झाकण ठेवून एक-दीड तास उबेला ठेवावे.
३) एक-दीड तासांनी पिठाचा गोळा दुप्पट आकाराचा होईल. थोडा तेलाचा हात लावून एकदा किंचित पंच करून घ्यावे.
४) बेकिंग ट्रेला थोडा तेलाचा हात लावावा आणि किंचीत कोरडे पिठ भुरभूरावे. १० एकसमान गोळे करावे आणि एकमेकांना चिकटून ठेवावे. वरून प्लास्टिकची पिशवी ठेवून पावाचे गोळे अजून फुलून येण्यासाठी १/२ तास झाकून ठेवावे.
५) १/२ तासाने ओव्हन ३७५ F (१८८ C) वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट होईस्तोवर पावाच्या गोळ्यांवर दुधाने हलक्या हाताने ब्रशिंग करावे. ओव्हन प्रिहीट झाल्यावर पाव २० ते २२ मिनीटांसाठी बेक करावे. ओव्हन बंद करावा, ट्रे ३ ते ४ मिनीटांनी बाहेर काढावा. कोमट झाल्यावर पाव सर्व्ह करावा.
गरमगरम पाव मिसळ, पावभाजी, बटाटा वडा, छोले, पिंडी छोले या पदार्थांबरोबर छान लागतो.

टीप:
१) मी ब्रेड बनवण्यासाठी सेल्फ राईजिंग फ्लोर वापरले होते. सेल्फ राईजिंग फ्लोर म्हणजेच ऑल पर्पज फ्लोर, मिठ आणि बेकिंग पावडर यांचे मिश्रण. म्हणून सेल्फ राईजिंग फ्लोरसुद्धा ब्रेड बनवण्यासाठी वापरता येते फक्त यामध्ये मिठ आधीपासूनच असते म्हणून मिठ अगदी थोडेच घालावे. जर मैदा (ऑल पर्पज फ्लोर) वापरणार असाल तर मिठ दिलेल्या प्रमाणात घालावे.
२) पिठ तेल घालून जितके जास्त मळाल तितका जास्त पाव मऊ आणि हलका होईल.

Labels:
Indian Bread, Pav bhaji, Vada Pav

No comments:

Post a Comment