Falooda in English
वाढणी ४ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे (साहित्य तयार असल्यास)
साहित्य:
८ स्कूप्स वेनिला आईसक्रिम
१/२ कप रूह अफ्जा रोझ सिरप
२ टेस्पून सब्जा बी
२ ते ३ कप थंड दूध
२ टेस्पून ड्राय फ्रुट्स, छोटे तुकडे
१ पॅकेट फालूदा शेवया
१ कप स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली
४ टेस्पून टूटी-फ्रुटीचे तुकडे
सजावटीसाठी चेरी
कृती:
१) फालूदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकीटावरील कृती वाचून जेली बनवावी.
२) सब्जा बी फालूदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १/२ कप पाण्यात भिजवून ठेवाव्यात.
३) १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालूदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनीटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसर्या भांड्यात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे.
४) दुध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे.
५) फालूदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे . त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आईसक्रिमचा १ स्कूप, दुध आणि परत त्यावर १ स्कूप वेनिला आईसक्रिम घालावे. ड्रायफ्रुट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सर्व्ह करावे. सर्व्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.
टीप:
१) फालुदाच्या मधल्या लेयरमध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अननसाचे तुकडे इत्यादी आंबटगोड चवीची फळे घातल्यास फालुदा दिसायला आकर्षक तसेच चवीला स्वादिष्ट लागतो.
Labels:
Falooda, Indian Dessert, Phalooda
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment