Paneer Tikka Masala in English
वाढणी: १ प्लेट (साधारण २ ते ३ जणांपुरती)
वेळ: ४० मिनीटे
साहित्य:
कांदा पेस्ट
२ मध्यम कांदे
२ टिस्पून तेल
काजूपेस्ट
१/२ कप काजू
१/४ कप मगज बी
टोमॅटो प्युरी
३ लालबुंद टोमॅटो
इतर जिन्नस
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
२ चिमूटभर कसूरी मेथी
१ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बटर
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
पनीर टिक्काच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कृती:
प्रथम सर्व पेस्ट तयार करून घ्याव्यात.
कांदा पेस्ट
कच्च्या कांद्याची पेस्ट - १ कांदा मोठे तुकडे करून मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी.
परतलेल्या कांद्याची पेस्ट - १ कांदा पातळ उभे काप करून तेलामध्ये मोठ्या आचेवर परतून घ्यावे. कांदा निट परतला कि किंचीत पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
काजू पेस्ट
काजू, मगज बी, आणि १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी.
टोमॅटो प्युरी
३ टोमॅटो गरम पाण्यात २ ते ३ मिनीटे उकळून घ्यावे. लगेच गार पाण्यात घालावे म्हणजे साले सुटायला मदत होईल. साले काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी.
मुख्य कृती
१) पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलेलसणाची पेस्ट परतावी. लगेच कच्च्या कांद्याची पेस्ट घालून मोठ्या आचेवर कांदा ब्राऊन होईस्तोवर परतावे.
२) टोमॅटोची प्युरी घालून मध्यम आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईस्तोवर परतावे. नंतर परतलेल्या कांद्याची पेस्ट आणि काजूची पेस्ट घालून मिक्स करावे.
३) यात धणे-जिरेपूड, कसूरीमेथी, लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून दाटसर ग्रेव्ही बनवावी.
गरमागरम ग्रेव्ही, पनीर व्हेजिटेबल टिक्क्यावर घालून सर्व्ह करावी.
टीप:
१) लालसर रंग येण्यासाठी अगदी किंचीत लाल रंग १ चमचा पाण्यात मिसळून ग्रेव्ही उकळताना घालावा.
२) काजूपेस्ट घालताना एकदम सगळी घालू नये. आधी २ ते ३ टेस्पून घालून ढवळावे. काजूची पेस्ट जास्त झाल्यास ग्रेव्हीची चव बदलते. चव पाहूनच अजून काजूपेस्ट घालावी.
Labels:
Paneer Tikka Masala, Vegetable Paneer Tikka, Punjabi Paneer Tikka
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment