Mix Baked Vegetable in English
साहित्य:
१ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१/२ कप उभा बारीक चिरलेला कांदा
पाव कप गाजराच्या फोडी
पाव कप फरसबी चिरून (१ इंच)
पाउण कप अर्धवट शिजवलेले मटार + मका दाणे
१/२ कप भोपळी मिरची उभी चिरून
२ शिजलेल्या टोमॅटोची प्युरी
(मिक्सरवर प्युरी करताना पाणी घालू नये. प्युरी करताना मिक्सरमध्ये २ लसणीच्या पाकळ्या टाकाव्या)
८-१० काजू बी
३-४ कढीपत्ता पाने
२ लाल सुक्या मिरच्या
१ चमचा गरम मसाला
२ चमचे बटर
मीठ
३ टेस्पून कोथिंबिर
लिंबाचा रस
ओव्हनमध्ये बटाटा, गाजर, चिरलेल्या कांद्यातील थोडा कांदा, फरसबी, सिमला मिरची ३५० F वर १२-१४ मिनिटे बेक करावे. किंवा आपल्या घरातील ओव्हनच्या सेटींग प्रमाणे adjust करून भाज्या गोल्डन ब्राउन होवू द्याव्यात. त्यामुळे भाजीला छानसा स्वाद येतो.
कृती:
१) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये मध्यम आचेवर बटर घालावे. कढीपत्ता, बेक
न केलेला कांदा, काजू बी घालावी. कांदा परतला गेला की लाल मिरचीचे तुकडे, बेक केलेल्या भाज्या घालाव्यात.
२) भाज्यांना थोडी वाफ काढावी. गरम मसाला घालावा. टोमॅटो प्युरी आणि लसूण यांचे मिश्रण घालावे. २-३ मिनीटे वाफ काढावी. त्यात मटार, मका दाणे घालावे. २-३ मिनीटे वाफ काढावी. मिठ घालावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. लिंबाचा रस घालावा.गरम गरम भाजी पोळीबरोबर किंवा पावाबरोबर खावी.
Labels:
mix vegetable recipe, baked vegetable recipe, mixed veg recipe, north indian recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment