Vegetable Biryani in English
साहित्य:
१ कप बासमती तांदूळ
२ मध्यम कांदे उभे चिरून
१/२ कप मटार
५-६ फ्लॉवरचे तूरे अर्धा कप गाजर आणि फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांचे तुकडे सुद्धा घालू शकतो)
२ मध्यम टॉमेटोची प्युरी (टोमॅटो शिजवून त्याची साले काढावीत आणि मिकसरवर प्युरी करावी)
८-९ काजू बी
१ टेस्पून लसूण पेस्ट
१ टेस्पून आले पेस्ट
१/२ कप दूध
पाव ते अर्धा कप दही
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
१ टेस्पून वेजिटेबल बिर्यानी मसाला
चवीपुरते मीठ
२ टेस्पून तेल
कृती:
१) तांदुळाच्या अडीचपट पाणी घेऊन त्यात १/२ चमचा तेल आणि पाऊण चमचा मीठ घालावे. त्यात तांदूळ घालावे. वरुन झाकण ठेवून तांदूळ शिजू द्यावे. (तांदूळ पूर्ण शिजवू नयेत. अगदी किंचित कच्चे ठेवावे) उरलेले पाणी काढून घ्यावे. आणि तयार भात परातीत मोकळा करून ठेवावा.
२) भाज्या अर्धवट शिजवून घ्याव्यात (गाजर, फारसबी, फ्लॉवर.. वगैरे)
३) नॉनस्टिक फ्राईंग पॅनमध्ये ३ चमचे तेल घेऊन त्यात कांदा, काजू बी, आले-लसूण पेस्ट घालावी. २ मिनिटे मंद आचेवर परतून त्यात टोमॅटो प्युरी घालावी. १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालून झाकण ठेवून वाफ काढावी. नंतर त्यात फेटलेले दही, बिर्याणी मसाला घालून ढवळावे. शिजवलेल्या भाज्या आणि थोडे मीठ घालावे.
४) दुसर्या नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा भाग शीजलेले तांदूळ पसरावे, त्यावर तयार ग्रेवी (टोमॅटो प्युरी आणि भाज्या) घालावी. आणि त्यावर उरलेला अर्धा भाग भात पसरावा.
५) १/२ कप दूध घालून मंद आचेवर १०-१२ मिनिटे वाफ काढावी. बिर्याणी तयार झाल्यावर त्यात कडेने तूप सोडावे.
टीप:
१) जर ओव्हनमध्ये बिर्याणी करायची असेल तर ओव्हन ४०० F प्रिहीट करावे. ओव्हनसेफ भांड्यात क्रमांक ४ व ५ मध्ये दिल्याप्रमाणे भाताचा व भाजीचा थर लावावा. वरून अल्युमिनीयम फॉईलने भांडे बंद करावे व १५ मिनीटे ओव्हनमध्ये ठेवावे.
Labels:
vegetable Biryani, easy recipe of Biryani, Dum Biryani, veg biryani recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment