आपण बाजारात मिळणारे चॉकलेट बर्याचदा खातो. हि घरगुती चॉकलेट वडीची कृती..
साहित्य:
१/२ कप कोको पावडर
१ कप मिल्क पावडर
१/४ कप लोणी / अनसॉल्टेड बटर
१/२ कप साखर
१/४ कप पाणी
कृती:
१) एका बोलमध्ये कोको पावडर आणि मिल्क पावडर एकत्र करून चाळून घ्यावी.
२) पोळपाटाला लोणी लावून घ्यावे. लाटण्यालासुद्धा लोणी लावून घ्यावे.
३) साखरेचा गोळीबंद पाक करावा. पॅन गॅसवरून उतरवावा लगेच त्यात लोणी घालावे, घोटावे. लगेच मिक्स्ड पावडर घालावी. जोरजोरात घोटत राहावे. पावडरची गोळी राहू देवू नये. याचे घट्टसर तुकतुकीत असे मिश्रण तयार होईल.
४) मिश्रण निवायच्या आत पोळपाटावर पसरावे. लाटण्याने समान लाटावे. १ सेमी उंचीचा थर बनवावा. सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. मिश्रण सुकले कि वड्या वेगवेगळ्या कराव्यात.
सजावटीसाठी काजू तुकडा किंवा बदामाचे काप घालावेत.
टीप:
१) पाक बनवताना, पावडर मिक्स करताना वेळेची काळजी घ्यावी. जर पाक जास्त घट्ट झाला किंवा लोणी कमी पडले तर वड्यांचे मिश्रण मोकळे होते आणि वडी पडत नाही. त्यामुळे सर्व जिन्नस आधीपासून तयार ठेवावे.
२) मिल्क पावडर एकदम पिठासारखी असावी. काही ठिकाणी किंचीत दाणेदार पावडर मिळते. यामुळे वड्यांच्या चवीत फरक पडतो. वड्या थोड्या चरचरीत लागतात.
३) जर वातावरण थंड असेल तर हे मिश्रण पटकन आळते. जर मिश्रण फळफळीत झाले तर थोडा वेळ मिश्रण गॅसवर ठेवावे आणि थोडे लोणी घालावे. चांगल्याप्रकारे घोटून मिक्स करावे व लगेच पोळपाटावर लाटून वड्या पाडाव्यात.
Labels:
Chocolate Wadi, Homemade Chocolate, Chocolate Recipe
No comments:
Post a Comment