Upavasachi Khandvi (English Version)
साहित्य:
१/२ कप वरी तांदूळ
१/२ कप किसलेला गूळ
दिड कप पाणी
२ चमचे तूप
१ लहान चमचा वेलची पूड
१/४ कप ओले खोबरे
कृती:
१) वरी तांदूळ पाण्याखाली धुवून निथळत ठेवावा. सर्व पाणी निघून जावू द्यावे.
२) पातेल्यात २ चमचे तूप गरम करून त्यावर हे तांदूळ थोडे भाजून घ्यावे. दुसर्या पातेल्या दिड कप पाणी उकळत ठेवावे.
३) भाजलेल्या तांदूळात उकळलेले पाणी घालून ढवळावे १-२ वेळा वाफ काढावी. कधी कधी तांदूळ सर्व पाणी शोषून कोरडे होतात त्यामुळे थोडे पाणी वाढवावे लागते. त्याची काळजी घ्यावी. वरी तांदूळ निट शिजले आहेत कि नाही हे चव घेऊन बघावे.
४) तांदूळात पाणी शोषले गेले कि गूळ, नारळ आणि वेलचीपूड घालावी व ढवळावे. १-२ वेळा वाफ काढावी. तूप लावलेली थाळी तयार ठेवावी. मिश्रण दाटसर झाले कि थाळीत घालून थापावे व १ सेंमी चा थर करावा.
वरून खवलेला नारळ घालावा व वड्या पाडाव्यात.
Labels:
Khandavi Recipe, Sweet Khandavi, Vari Tandul Khandavi, Bhagar khandavi, vari tandool khandavi
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment