Tomato Chutney in English
वाढणी: ४ ते ५ जण (१/२ ते ३/४ कप)
हि चटणी इडली, डोसा, उत्तप्पा तसेच पेसरट्टू (मूगाचा डोसा) अशा पदार्थांबरोबर छान लागते.
साहित्य:
३ मध्यम टोमॅटो, मोठे चौकोनी तुकडे (Know more: health benefits of Tomato)
४ टेस्पून शेंगदाणे
२ टिस्पून उडीद डाळ
१ टेस्पून तेल
१/८ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून मोहोरी
५ ते ६ सुक्या लाल मिरच्या, तोडून घ्याव्यात
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
कृती:
१) पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी घालावी. मोहोरी तडतडली कि त्यात हिंग आणि शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे मध्यम आचेवर परतावेत. शेंगदाणे थोडे ब्राऊन होवू द्यावेत.
२) शेंगदाणे थोडे ब्राऊन झाले कि त्यात उडीद डाळ घालावी. उडीद डाळ आणि लाल मिरच्या ब्राऊन होईस्तोवर परतावे (साधारण १५ ते २० सेकंद). नंतर त्यात टोमॅटो घालून साधारण २ ते ३ मिनीटे परतावे. पॅनवर झाकण ठेवावे म्हणजे टोमॅटो पटकन शिजतील.
३) गॅस बंद करून मिश्रण थंड होवू द्यावे. थंड झालेल्या मिश्रणात चवीनुसार मिठ आणि थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. पाणी घालू नये.
Labels:
Tomato chutney, Indian Condiments
टोमॅटो चटणी - Tomato Chutney
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment