Showing posts with label Tomato. Show all posts
Showing posts with label Tomato. Show all posts

टोमॅटो रसम - Tomato Rasam

Tomato Rasam in English



वेळ: ४० ते ५० मिनिटे

वाढणी: ३ ते ४ जणांसाठी



rasam soup, tomato rasam, lemon rasam, garlic rasam, rassam recipeसाहित्य:

३ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून

१/४ कप तूर डाळ

२ ते ३ कप साधं पाणी

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ ते ३ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या, १/२ टीस्पून उडीद डाळ, १५ ते २० मेथी दाणे, २ लसणीच्या पाकळ्या (ठेचून,), १ डहाळी कढीपत्ता

१० ते १२ मिरी दाणे, भरडसर ठेचून

१ हिरवी मिरची, चिरून

दीड टीस्पून धनेपूड

१/२ टीस्पून जिरेपूड

२ टीस्पून चिंच

चवीपुरते मीठ



कृती:

१) प्रेशर कुकरमध्ये तूर डाळ २ कप पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी काढून घ्यावे. डाळ चेपून जेवढे शक्य तेवढे पाणी काढावे.

२) १/२ कप गरम पाणी घ्यावे त्यात चिंच भिजत ठेवावी. १० मिनीटांनी चिंचेचा कोळ काढून घ्यावा.

३) २ कप साधं पाणी आणि २ कप डाळीचे पाणी एकत्र पातेल्यात उकळण्यास ठेवावे. उकळी फुटली कि टोमॅटो घालून किमान २० मिनिटे किंवा टोमॅटो नरम होईस्तोवर मध्यम आचेवर उकळू द्यावे. हिरवी मिरची आणि १/२ चिंचेचा कोळही घालावा.

४) छोट्या कढल्यात तेल गरम करावे. उडीद डाळ, मेथी दाणे घालावेत. रंग गुलाबीसर होईस्तोवर थांबावे. नंतर लसूण आणि लाल मिरच्या घालाव्यात. ५-७ सेकंदानी मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. ५-७ सेकंदानी ही फोडणी रस्सम वर घालावी.

५) मीठ, कुटलेली मिरी, धने-जिरेपूड घालून मिक्स करावे. १०-१५ मिनिटे उकळवावे.

चव पाहून जिन्नस (तिखट, मीठ, चिंच ) अड्जस्ट करावे.



रसम भाताबरोबर किंवा नुसते सुपसारखे प्यायलाही छान लागते.



टीप:

१) छान पिकलेले, लालबुंद टोमॅटो वापरावेत.

२) जर टोमॅटोचे बारीक तुकडे रसममध्ये आवडत नसतील तर तोमतो चीरण्याऐवजी प्युरी करावी.

३) रसम थोडे स्पाईसीच असते. पण थोडे कमी तिखट हवे असल्यास मिरीचे प्रमाण कमी करावे.

४) जर रसम थोडे आधी करून ठेवले तर चांगले मुरते आणि चवीला छान लागते.

टोमॅटो राईस - Tomato Rice

Tomato Rice in English



वेळ: १० ते १५ मिनिटे

वाढणी: २ जणांसाठी



tomato rice, tomato flavored rice, bhatache prakar, types of rice, rice recipes, basmati riceसाहित्य:

२ कप भात (शक्यतो बासमती)

२ मोठे टोमॅटो, बारीक चिरून

३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे

२ टेस्पून तेल किंवा तूप, २ चिमटी जिरे, १/८ टीस्पून हिंग, २ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने

चवीपुरते मीठ

कोथिंबीर बारीक चिरून

where is rice from, tomato rice, spicy rice, tomato flavored rice, Indian rice recipesकृती:

१) कढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठ्या आचेवर परतावे. लसणीच्या कडा गडद ब्राऊन झाल्या पाहिजेत आणि लसणीचा कच्चा वास जावून छान सुगंध आला पाहिजे.

२) लसूण परतली गेली कि जिरे, हिंग, हिरवी मिरची आणी कढीपत्ता घालून थोडावेळ फ्राय करावे.

३) चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठ्या आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होउन कडेने तेल सुटले पाहिजे.

४) यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे. टोमॅटोचा तयार मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागला पाहिजे. झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी.

कोथिंबिरीने सजवून गरमच सर्व्ह करावे.



टीपा:

१) हिरव्या मिरच्यांऐवजी लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकतो.

२) लसूण व्यवस्थित परतली गेली पाहिजे (करपू देउ नये). जर लसूण कच्ची राहिली तर तेवढी चांगली चव भाताला येत नाही.

३) ताजे, लाल, आणि पूर्ण पिकलेले टोमॅटो वापरावेत. त्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते.

४) आवडीप्रमाणे गरम मसाला घालू शकतो. चव छान लागते. पण गरम मसाल्याने टोमॅटोचा स्वाद नाहीसा होतो.

पास्ता - Pasta

Pasta in English

२ जणांसाठी
वेळ: ३० मिनीटे

pasta recipe, homemade pasta recipe, Italian, Italian penneसाहित्य:
१ कप होल ग्रेन पेने पास्ता
१/४ कप लाल भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे
१/४ कप हिरवी भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे
१/४ टिस्पून लाल तिखट
३ टेस्पून ऑलिव ऑईल
१ टेस्पून पार्मिजान चिझ, किसलेले
२ चिमूट ओरेगानो
आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स
पास्ता शिजवण्यासाठी मिठ
३ टेस्पून पास्ता सॉस

कृती:
१) एका मोठ्या खोल पातेल्यात ५ ते ६ कप पाणी उकळवावे. त्यात मीठ घालून ढवळावे. पाणी उकळायला लागले कि त्यात १ कप पास्ता घालून १५ ते २० मिनीटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार शिजवून घ्यावा. शिजवताना झाकण ठेवू नये तसेच मोठ्या आचेवर शिजवावा. त्यामुळे पाणी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून एकदम खोलगट आणि मोठे पातेले घ्या. तळाला चिकटू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे.
२) पास्ता शिजला कि एका चाळणीत काढून घ्यावा आणि त्यावर थंड पाणी घालावे. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे.
३) पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे, त्यात भोपळी मिरची घालून १/२ ते १ मिनीट परतावे (टीप २). चिमूटभर ओरेगानो, लाल तिखट आणि मिठ घालावे. लगेच ३ टेस्पून पास्ता सॉस घालून लगेच शिजलेला पास्ता घालावा. गॅस मंद ठेवून १/२ ते १ मिनीट निट मिक्स करावे. वाटल्यास पास्ता सॉस वाढवावा. लगेच सर्व्हींग बोलमध्ये काढावे.
सर्व्ह करताना १ चिमूटभर ड्राय ओरेगानो चुरून भुरभूरावा. तसेच पार्मिजान चिझ घालावे आणि पास्ता सर्व्ह करावा.

टीप:
१) रेड चिली फ्लेक्स गरज वाटल्यास तिखटपणासाठी आवडीप्रमाणे घ्यावे.
२) भोपळी मिरची ३० ते ४० % शिजवावी पूर्ण शिजवू नये. भोपळी मिरचीचे तुकडे थोडे करकरीत राहिलेलेच चांगले लागतात.
३) पास्ता शिजताना जर पाणी कमी खुप कमी झाले असेल तर गरजेपुरते पाणी वाढवावे.

Labels:
Tomato Pasta, Pasta sauce, Homemade pasta sauce

पास्ता सॉस - Homemade Pasta Sauce

Pasta Sauce in English

साधारण १ कप पास्ता सॉस
वेळ: ३५ मिनीटे
pasta sauce, Italian pasta sauce, pasta sauces recipes, vegetarian pasta sauceसाहित्य:
६ टोमॅटो
२ टेस्पून रेडीमेड टोमॅटो पेस्ट
३ टेस्पून ऑलिव ऑईल
४ मोठ्या लसूण पाकळ्या, पातळ चकत्या
१/४ कप कांदा, उभा पातळ चिरून
१/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून ड्राय ओरेगानो
२ चिमटी मिरपूड
मीठ
पास्ता कसा बनवावा?

कृती:
१) प्रत्येक टोमॅटोचे दोन तुकडे करा. मोठ्या बेकिंग ट्रेमध्ये १ टेस्पून ऑलिव ऑईल घालून हाताने पसरवून घ्या. टोमॅटोची चिरलेली बाजू प्लेटला लागेल अशा रितीने ठेवा त्याच भांड्यात लसूण पेरा.
२) दुसर्‍या छोट्या बेकिंग भांड्यात कांदा आणि थोडे तेल असे मिक्स करा. ओव्हन ४०० F वर प्रिहीट करून टोमॅटो आणि कांदा-लसूण १५ मिनीटे बेक करा. दोन्ही भांडी मधल्या कप्प्यावर ठेवा. मधेमधे कांदा आणि लसूण जळत नाहीत ना हे चेक करा.
३) बेक झाल्यावर टोमॅटोला पाणी सुटलेले असेल. कांदा लसणीचा रंग किंचीत बदलला असेल. सर्व गार झाले कांदा बारीक चिरून बाजूला ठेवावा. टोमॅटो आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
४) पॅनमध्ये ऑलिव ऑईल किंचीत गरम करावे त्यात लाल तिखट, कांदा घालून परतावे. नंतर टोमॅटोचे मिश्रण घालावे, ढवळावे. टोमॅटोची पेस्ट घालावी. निट मिक्स करावे आणि मंद आचेवर १०-१५ मिनीटे शिजू द्यावे.
५) सॉस थोडा दाट झाला कि त्यात ओरेगानो, मिरपूड आणि मिठ घालावे २ मिनीटे मंद आचेवर उकळू द्यावे. काचेच्या बरणीत काढून ठेवावा.
हा सॉस साधारण ५ ते ६ जणांच्या सर्व्हींगसाठी उपयोगी पडेल.

टीप:
१) टोमॅटो पेस्टमुळे रंग छान येतो. जर टोमॅटो पेस्ट मिळत नसेल तर थोडा टोमॅटो केचप जो फार गोड नसेल असा वापरू शकतो. पण यामुळे चवीत किंचीत फरक पडेल.
२) जर ओरेगानो हर्ब मिळत नसेल तर बेसिल किंवा थाईमही या सॉसमध्ये वापरू शकतो, प्रत्येक हर्बची चव वेगवेगळे असते त्यामुळे चवीत हर्बच्या फ्लेवरनुसार फरक पडेल.

Labels:
pasta sauce, tomato pasta sauce, Oregano pasta sauce

गाजराची कोशिंबीर - Gajarachi Koshimbir

Carrot and Tomato Salad in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी

carrot salad, gajar kozambari, Vitamin A, how to make carrot salad, koshimbir, कोशिंबीरसाहित्य:
१ कप गाजराचा किस (३ मध्यम गाजरं)
१ मध्यम टोमॅटो
२ लहान हिरव्या मिरच्या
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून जिरे
१ टिस्पून तूप
१ टिस्पून साखर, किंवा चवीनुसार
चवीनुसार मिठ

कृती:
१) गाजराचा किस एका वाडग्यात घ्यावा. त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा. मिरच्या चिरून घ्याव्यात, थोडे मिठ घालून चुरडाव्यात आणि गाजराच्या किसात घालाव्यात. (टीप १)
२) यामध्ये शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, कोथिंबीर, मिठ आणि साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात हिंग, जिर्‍याची फोडणी करावी. हि गरम फोडणी लगेच कोशिंबीरीत घालावी आणि छान मिक्स करावे.
जेवताना तोंडीलावणी म्हणून हि कोशिंबीर छान लागते.

टीप:
१) मिरच्या चुरडून घालायच्या नसतील तर तूपाची फोडणी करतो त्यात चिरलेल्या मिरच्या घालाव्यात म्हणजे सर्व कोशिंबीरीला मिरचीचा तिखटपणा लागतो.
२) डाएटमुळे तुपाची फोडणी टाळायची असेल फोडणी न घालता, जिर्‍याचा स्वाद लागावा म्हणून एक-दोन चिमटी जिरेपूड घालावी.

Labels:
Gajarachi Koshimbir, Gajar Koshimbir, Carrot Salad

टोमॅटो चटणी - Tomato Chutney

Tomato Chutney in English

वाढणी: ४ ते ५ जण (१/२ ते ३/४ कप)

हि चटणी इडली, डोसा, उत्तप्पा तसेच पेसरट्टू (मूगाचा डोसा) अशा पदार्थांबरोबर छान लागते.

tomato chutney, south Indian style tomato chutney, Idli Chutney, chatani, chatni recipe, south Indian food,
साहित्य:
३ मध्यम टोमॅटो, मोठे चौकोनी तुकडे (Know more: health benefits of Tomato)
४ टेस्पून शेंगदाणे
२ टिस्पून उडीद डाळ
१ टेस्पून तेल
१/८ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून मोहोरी
५ ते ६ सुक्या लाल मिरच्या, तोडून घ्याव्यात
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी घालावी. मोहोरी तडतडली कि त्यात हिंग आणि शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे मध्यम आचेवर परतावेत. शेंगदाणे थोडे ब्राऊन होवू द्यावेत.
२) शेंगदाणे थोडे ब्राऊन झाले कि त्यात उडीद डाळ घालावी. उडीद डाळ आणि लाल मिरच्या ब्राऊन होईस्तोवर परतावे (साधारण १५ ते २० सेकंद). नंतर त्यात टोमॅटो घालून साधारण २ ते ३ मिनीटे परतावे. पॅनवर झाकण ठेवावे म्हणजे टोमॅटो पटकन शिजतील.
३) गॅस बंद करून मिश्रण थंड होवू द्यावे. थंड झालेल्या मिश्रणात चवीनुसार मिठ आणि थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. पाणी घालू नये.

Labels:
Tomato chutney, Indian Condiments

पिझ्झा सॉस - Pizza Sauce

Pizza Sauce in English

साहित्य:
२ मोठे टॉमेटो, लालबुंद
१/४ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून साखर
१ लहान तुकडा दालचिनी
१/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मिठ

कृती:
१) टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत. पातेल्यात टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करून त्यात टॉमेटो घालावेत ५ मिनीटे उकळवावेत. नंतर गॅस बंद करून ५ मिनीटे झाकून ठेवावेत.
२) साले आणि बिया काढून टाकाव्यात आणि टॉमेटोची प्युरी करून घ्यावीत.
३) एका नॉनस्टीक पॅनमध्ये टॉमेटोची प्युरी घालावी आणि त्यात लाल तिखट, साखर, दालचिनी, आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मिठ घालून मंद आचेवर १० मिनीटे परतावे. दाटसर सॉस तयार झाला कि दालचिनी काढून टाकावी.

पिझ्झा बेसची कृती (Pizza Base)

पिझ्झाची कृती (Paneer Pizza Recipe)

झटपट ब्रेड पिझ्झा

Labels:
Pizza Suace, Tomato Pizza Sauce, How to Make Pizza Sauce

टोमॅटोची भाजी - Tomato Bhaji

Tomato Bhaji (English Version)

tomato recipe, curry recipes, tomato recipes, fresh produce, fresh tomato soup, grocery, indian style curry, curried tomato

साहित्य:
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/२ कप चिरलेला कांदा
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/८ टिस्पून हळद, २-३ कढीपत्ता पाने
२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/२ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून गुळ
चवीनुसार मिठ
१ टेस्पून कोथिंबीर

कृती:
१) कढईत तेल गरम करून जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी. आले पेस्ट घालून काही सेकंद परतावे. त्यात चिरलेला कांदा घालावा. थोडे मिठ घालून कांदा परतून घ्यावा.
२) कांदा निट शिजला कि त्यात चिरलेला टोमॅटो घालून ढवळावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून टोमॅटो शिजू द्यावा.
३) टोमॅटो अर्धवट शिजला कि त्यात गूळ घालावा. निट मिक्स करून टोमॅटो शिजू द्यावा. गरजेनुसार मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
तयार भाजी गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.

Labels:
Tomato Curry, Indian Tomato Curry, Tomatochi bhaji, Sweet and sour Tomato Curry

टोमॅटो ऑम्लेट - Tomato Omlete

Tomato Omelette (English Version)

tomato recipe, tomato omlette recipe, snacks, weight loss tomato diet, indian recipe, indian tava recipe, healthy recipe, Healthy indian recipe, low sugar recipe, low calorie recipe
साहित्य:
३ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो
एक ते दिड वाटी बारीक चिरलेला कांदा
दोन वाट्या तांदूळ पिठ
अर्धी वाटी बेसन
२ मिरच्या बारीक चिरून किंवा चवीनुसार लाल तिखट
२-३ लसूण पाकळ्यांची पेस्ट (ऑप्शनल)
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा हळद
१ चमचा जिरेपूड
हिंग
तेल
मीठ

कृती:
१) चणापिठ आणि तांदूळपिठ एकत्र करावे त्यात पाणी घालून दाटसर भिजवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. त्यात हळद, हिंग, चिरलेला टोमॅटो, कांदा, मिरच्या, लसूणपेस्ट, १ चमचा जिरेपूड
, कोथिंबीर, मीठ घालून निट मिक्स करावे. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनला तेल लावून घ्यावे. पॅन गरम होवू द्यावा. पॅन गरम झाला कि गॅस मध्यम आचेवर ठेवावा. एक डावभर मिश्रण फ्राईंग पॅनमध्ये घालावे. पाण्याचा हात घेउन मिश्रण बोटांनी किंवा डावेनेच पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू शिजू द्यावी.
टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. तसेच टोमॅटो ऑम्लेटबरोबर स्लाईस ब्रेडसुद्धा छान लागतो.

टीप :
१) काही जणांना पथ्यामुळे चणापिठ खायचे नसते त्यांनी पूर्ण तांदूळपिठ वापरून टोमॅटो ऑम्लेट बनवले तरीही चालते.

Labels:
Tomato Omelette, tomato Omlet, veg omlet recipe

टोमॅटो सूप / सार - Tomato Soup

Tomato Soup (English Version)

Tomato Soup, Tomato Soup Recipe, Tomato Recipe, Tomato saar, healthy soup recipe, vegetarian soup recipe, veggie soup recipe
साहित्य:
१/२ किलो टोमॅटो
१ चमचा तांदूळ पिठ
२ तमालपत्र
१ लहान चमचा जिरं
१/२ चमचा जिरपूड
१ चमचा तिखट
१ चमचा तूप
हिंग
दिड चमचा साखर
चवीपुरते मिठ
कोथिंबीर

कृती:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवून घ्यावेत(कूकरमध्ये ३ शिट्ट्या कराव्यात). थंड झाले कि त्याची साले काढावीत.
२) तांदूळ पिठ १/२ वाटी पाण्यात गुठळ्या न होत्या कालवून घ्यावे.
३) थंड झालेल्या टोमॅटोचा देठाकडचा भाग काढून टोमॅटो मिक्सरमध्ये घालावेत त्यातच कालवलेले तांदूळपिठ, तिखट, साखर, मीठ घालावे, आणि सर्व एकत्र करून मिक्सरवर वाटून घ्यावे. हे करताना जास्तीचे पाणी घालू नये. मिश्रण मिक्सरवर फिरवल्यावर आवश्यक तेवढे पाणी घालावे.
४) ही टोमॅटोची पातळसर प्युरी चाळणीवर गाळून घ्यावी, म्हणजे टोमॅटो सूपमध्ये कसल्याच गुठळ्या, बिया राहणार नाहीत. गाळलेल्या रसात १/२ चमचा जिरपूड, २ तमालपत्र घालावे. गाळलेले मिश्रण उकळण्यासाठी पातेल्यात काढून घ्यावा.
५) लहान कढल्यात / लोखंडी पळीत १ चमचा तूप गरम करावे. जिरे, हिंग घालून फोडणी करावी. वरून टोमॅटो सूपला फोडणी द्यावी आणि थोडावेळ उकळावे. कोथिंबीर घालावी.

टीप:
१) टोमॅटो कूकरमध्ये शिजवताना थोडे जिरे घातल्यास जिर्याचा वास छान लागतो.
२) तमालपत्र फक्त उकळताना घातल्यास तमालपत्राचा उग्रपणा सूपाला लागणार नाही. जर तमालपत्र फोडणीत घातले तर त्याचा वास वरचढ होतो.
३) आवडत असल्यास वरून थोडे क्रिम घालू शकतो.
४) तांदूळपिठाऐवजी कॉर्न फ्लोरही वापरू शकतो.

हिरव्या टोमॅटोची भाजी - Hirwa Tomato bhaji

Hirvya Tomatochi Bhaji (English version)


tomato bhaji, tomato bhaaji, kachche tomato, green tomato curry, hirve tomato, hirvya tomatochi bhaji
साहित्य:
२ हिरवे टोमॅटो
१ मध्यम कांदा
२ टेस्पून सुका किसलेला नारळ
१ टेस्पून बेसन
१ टिस्पून आले-लसूण पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
२ चमचे चिंचेचा घट्ट कोळ
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
१ ते दिड चमचा लाल तिखट
चिरलेली कोथिंबीर
मीठ

कृती:
१) कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बेसन व नारळ घालावा. खमंग भाजून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. परतलेला कांदा थंड करावा. थोडे पाणि घालून मिक्सरवर कांदा बारीक वाटून घ्यावा.
२) कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात तयार केलेले वाटण घालावे. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे. वाटण जरा गरम झाले कि त्यात धणे-जिरे पूड आणि चिंचेचा कोळ घालावा. टोमॅटोच्या फोडी वाटणात घालून मध्यम आचेवर वाफ काढावी. मिठ घालावे. टोमॅटो शिजले कि भाजीवर कोथिंबीर घालावी व गरम गरम पोळीबरोबर खावी.

टीप : १) जर भाजीला जास्त मसालेदार चव हवी असेल तर आवडीनुसार गरम मसाला किंवा करी मसाला घालू शकतो.

Labels:
Tomato Curry, Tomato curry recipe, Green tomato curry, spicy curry recipe

टोमॅटोची कढी - Tomatochi Kadhi

Tomato Kadhi

tomato recipe, tomato curry, tomato saar, tomatochi kadhi, tomato kadhee
साहित्य:
६ मध्यम आकाराचे टोमॅटो
४ टेस्पून चणा पिठ (बेसन)
१/२ चमचा जीरेपूड
फोडणीसाठी १ टीस्पून तूप/ बटर, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीपुरती साखर, मीठ

कृती:
१) टोमॅटो शिजवून घ्यावेत. साले काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी, बिया काढून टाकण्यासाठी बारीक गाळण्यामध्ये गाळून घ्यावे.
२) चणा पिठ टोमॅटो प्युरीमध्ये गुठळ्या न होता मिक्स करावे. चवीपुरते मीठ आणि साखर घालावी, लाल तिखट घालावे. चवीसाठी जीरेपूड घालावी.
३) पातेल्यात तूप गरम करावे. मोहोरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात बेसन घातलेली टोमॅटो प्युरी घालावी. चणा पिठ घातल्यामुळे कढीला घट्टपणा येतो. म्हणून थोडे पाणी घालून आवडीनुसार घट्टपणा adjust करावा. मध्यम आचेवर कढी शिजू द्यावी.
४) सर्व्ह करताना कढीवर चिरलेली कोथिंबीर घालावी.