Thalipith Bhajani in English
साधारण दिड किलो भाजणी
साहित्य:
१ किलो तांदूळ
२०० ग्राम सालासकट हरभरे
२०० ग्राम सालासकट उडीद डाळ
१ वाटी गहू
पाव किलो ज्वारी
१०० ग्राम धणे
२ चमचे जिरे
कृती:
१) सर्व साहित्य वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. भाजताना मध्यम आचेवर भाजावे.
२) भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडे सरसरीत दळून आणावे.
टीप:
१) सर्व साहित्य खमंग भाजले गेले पाहिजे, जर कमी भाजले गेले तर चव चांगली लागत नाही.
२) भाजणी शक्यतो जाड प्लास्टिक पिशवीत भरून डब्यात ठेवावे. इतर पिठांसोबत एकाच डब्यात ठेवू नये. भाजणीचा वास इतर पिठांना लागतो.
३) अमेरीकेत भाजणी बनवणे थोडे कठीण आहे कारण मिक्सर तेवढे पॉवरफुल नसतात. भारतातून भाजणी आणली असेल तर डबल प्लास्टिक पिशव्या घेऊन त्यात भाजणी भरून घट्ट बंद करावी आणि फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे भाजणी ८ ते १० महीने छान राहते.
Labels:
bhajani, thalipith bhajani
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment