Turmeric Pickle in English
१/२ कप लोणचे
वेळ: १५ ते २० मिनीटे
साहित्य:
१/२ कप किसलेली ओली हळद (कृती क्र. ३)
१० ते १२ मेथी दाणे
६ ते ७ हिरव्या मिरच्या
एका लिंबाचा रस
१ टेस्पून किसलेले आले
३/४ ते १ टिस्पून कुटलेली मोहोरी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हिंग
कृती:
१) कढल्यात तेल गरम करावे. त्यात मेथी दाणे तळून घेऊन बाजूला काढावे.
२) त्याच तेलात मोहोरी घालून तडतडू द्यावी, हिंग घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी दुसर्या एका भांड्यात ओतून गार होवू द्यावी.
३) ओली हळद स्वच्छ धुवून सोलावी व किसून घ्यावी. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. तळलेले मेथी दाणे कुटून घ्यावे.
४) एका वाडग्यात किसलेली हळद, किसलेले आले, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, मिठ, कुटलेली मोहोरी, कुटलेले मेथी दाणे असे सर्व एकत्र करावे. थंड केलेली फोडणी यामध्ये घालून निट मिक्स करावे.
हे लोणचे लगेच खायला घेतले तरी चालते. तसेच हवाबंद बरणीत १५ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.
टीप:
१) जर किसलेले लोणचे नको असेल तर हळद सोलून बारीक तुकडे करावे. पण किसलेली हळद चांगली मिळून येते.
Labels:
Turmeric Pickle, Turmeric root pickle, olya Haladiche Lonche
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment