Showing posts with label Lonache. Show all posts
Showing posts with label Lonache. Show all posts

कैरीचे लोणचे - Kairiche Lonche

Mango Pickle in English

वेळ: १५ मिनीटे
साधारण २ कप लोणचे

green mango pickle, mango pickle, Indian mango pickle, ambyache lonache, ambyache lonche, aam ka achaarसाहित्य:
२ कप कैरीच्या लहान फोडी (३ लहान कैर्‍या)
दिड टिस्पून मिठ
१/२ टिस्पून हिंग
१/४ ते १/२ टिस्पून तळलेल्या मेथी दाण्याची पावडर (स्टेप २)
१ टेस्पून मोहोरी पावडर
२ टेस्पून लाल तिखट
फोडणीसाठी: ४ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हळद, १/४ टिस्पून हिंग

कृती:
१) कैर्‍या धुवून निट कोरड्या करून मगच त्याच्या फोडी कराव्यात. कैरीच्या फोडींना तासभर मिठ, लाल तिखट आणि हिंग लावून ठेवावे.
२) १२-१५ मेथी दाणे तेलात तळून घ्यावे. खलबत्त्यात कुटून बारीक पूड करावी.
३) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, आणि हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीत काढून गार होवू द्यावी.
४) कैरीच्या फोडींमध्ये मेथीपूड, मोहोरी पूड आणि गार झालेली फोडणी घालून मिक्स करावे.
हे लोणचे लहान काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

टीपा:
१) जर खार जास्त हवा असेल तर थोडी मोहोरी पावडर घालावी.
२) मेथीची पावडर आधी १/४ टिस्पूनच टाकावी. २-३ तासांनी चव पाहून जर लागली तर अजून थोडी घालावी.
३) मिठाचे प्रमाणही आवडीनुसार कमी किंवा जास्त करता येईल.
४) मी २ टेस्पून लाल तिखटापैकी १/२ टेस्पून तिखट हे रंगाचे (काश्मिरी) लाल तिखट वापरले होते व उरलेले दिड टेस्पून साधं तिखट वापरलं होतं.
५) वरील लोणच्यात मोहोरी पावडर बरोबर थोडी मोहोरीची डाळ वापरल्यास लोणचे दिसायला आणि चवीलाही छान होते.

लिंबाचे गोड लोणचे - Sweet Lime Pickle

Lemon Pickle in English

lemon pickle, sweet lemon pickleसाहित्य:
१२ लिंबं (टीप १)
१ किलो साखर (४ मोठ्या वाट्या वरपर्यंत भरून)
१ वाटी मिठ
३/४ वाटी लाल तिखट
२ टिस्पून जिरेपूड

कृती:
१) लिंबं धुवून घ्यावीत. व्यवस्थित पुसून घ्यावी, पाणी राहू देवू नये. मध्यम आकाराच्या फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. एका लिंबाच्या साधारण ८ ते १० फोडी कराव्यात.
२) फोडींना मिठ, तिखट, जिरेपूड लावून साधारण ८ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.
पद्धत १
साखरेचा १ तारी पाक करावा (१ किलो साखरेला दिड वाटी पाणी). पाक गार करावा. त्या पातेल्यात ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडी घालव्यात. ढवळून बरणीत भरावे.
सर्व लोणचे बरणीत भरले कि बरणीच्या तोंडाशी १ मुठभर साखर घालून झाकण बंद करावे. लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.

पद्धत २
जर पाक करायचा नसेल तर नुसती साखर, ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडीत मिक्स करावी. बरणीत भरून ठेवावे. रोजच्या रोज बरणी उघडून, स्वच्छ व कोरड्या चमच्याने लोणचे ढवळावे. असे साखर पूर्ण विरघळेस्तोवर करावे.

टीप:
१) लिंबं पातळ सालीची घ्यावी. जर अमेरीकेत असाल तर पातळ सालीची लिंबं मिळत नाहीत. अशावेळी पाणी एकदम चांगले उकळवावे. गॅस बंद करून त्यात आख्खी लिंबं घालावीत आणि वर झाकण ठेवावे. पाणी गार झाले कि लिंबं व्यवस्थित पुसून घ्यावी आणि एकदोन तास वार्‍यावर ठेवावी म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. मग वरच्या कृतीनेच लोणचे करावे.

हळदीचे लोणचे - Turmeric Pickle

Turmeric Pickle in English

१/२ कप लोणचे
वेळ: १५ ते २० मिनीटे

turmeric pickle, haladiche lonche, fresh turmeric pickle, turmeric recipes, turmeric root pickle, Indian pickle recipeसाहित्य:
१/२ कप किसलेली ओली हळद (कृती क्र. ३)
१० ते १२ मेथी दाणे
६ ते ७ हिरव्या मिरच्या
एका लिंबाचा रस
१ टेस्पून किसलेले आले
३/४ ते १ टिस्पून कुटलेली मोहोरी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हिंग

कृती:
१) कढल्यात तेल गरम करावे. त्यात मेथी दाणे तळून घेऊन बाजूला काढावे.
२) त्याच तेलात मोहोरी घालून तडतडू द्यावी, हिंग घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी दुसर्‍या एका भांड्यात ओतून गार होवू द्यावी.
३) ओली हळद स्वच्छ धुवून सोलावी व किसून घ्यावी. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. तळलेले मेथी दाणे कुटून घ्यावे.
४) एका वाडग्यात किसलेली हळद, किसलेले आले, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, मिठ, कुटलेली मोहोरी, कुटलेले मेथी दाणे असे सर्व एकत्र करावे. थंड केलेली फोडणी यामध्ये घालून निट मिक्स करावे.
हे लोणचे लगेच खायला घेतले तरी चालते. तसेच हवाबंद बरणीत १५ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.

टीप:
१) जर किसलेले लोणचे नको असेल तर हळद सोलून बारीक तुकडे करावे. पण किसलेली हळद चांगली मिळून येते.

Labels:
Turmeric Pickle, Turmeric root pickle, olya Haladiche Lonche

भाज्यांचे इंस्टंट लोणचे - Instant vegetable Pickle

Instant Vegetable Pickle in English

साधारण दिड कप
वेळ: २० मिनीटे

Instant pickle, spicy instant pickle, carrot pickle, cauliflower pickle, vegetable pickleसाहित्य:
१ कप गाजराचे छोटे तुकडे
१/२ कप कॉलिफ्लॉवरचे एकदम छोटे तुकडे
१/४ कप मटाराचे दाणे
१ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
दिड टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून हळद
१/४ टिस्पून हिंग
४ ते ५ मेथीचे दाणे
१/४ + १/४ टिस्पून मोहरी
१ लिंबाचा रस
२ टिस्पून तेल

कृती:
१) गाजर, कॉलिफ्लॉवर, मटार एकत्र करावेत. त्यात मिठ, लाल तिखट, हळद, हिंग, एकत्र करावे. १/४ टिस्पून मोहरीची भरडसर पावडर करून मिक्स करावी.
२) तेल गरम करून त्यात मेथी दाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे. मेथीदाणे बाजूला काढून त्याच तेलात १/४ टिस्पून मोहरी घालून फोडणी करावी. हि फोडणी गार झाली कि लोणच्यामध्ये घालावी.
३) तळलेले मेथीदाणे खलबत्त्यात कुटून घ्यावे आणि लोणच्यात मिक्स करावे.
४) लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हे लोणचे लगेच खाण्यासाठी छान लागते. फ्रिजमध्ये ४-६ दिवस सहज टिकते.

Label:
Instant vegetable pickle, Indian pickle recipe

मेथांबा - Methamba

Methamba in English

साधारण १/४ ते १/२ कप मेथांबा
वेळ: साधारण ३० मिनीटे

methamba, mango chutney, sweet mango relishसाहित्य:
१ कप सोललेल्या कैरीचे लहान तुकडे
१/२ कप गूळ
१/२ टिस्पून मेथी दाणे
१ टिस्पून तेल
१/८ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट, किंवा चवीनुसार
चवीपुरते मिठ

कृती:
१) लहान पातेल्यात तेल गरम करावे, मेथी दाणे घालून परतावे. मेथीदाणे परतले गेले कि त्यात मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. लगेच कैरीच्या फोडी घालून मंद आचेवर कैरी नरम होईस्तोवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. चवीपुरते मिठ घालावे.
२) कैरीच्या फोडी शिजल्या कि त्यात गूळ आणि थोडे पाणी घालावे. मंद आचेवर मिश्रण घट्टसर होईस्तोवर शिजू द्यावे. पाक आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवावा.

Labels:
Mango relish, Methamba

रसाची मिरची - Green Chili Pickle in Mustard

Green Chili Pickle in English

वाढणी: खाली दिलेल्या प्रमाणानुसार १/२ ते पाऊण कप लोणचे बनेल.

या पाककृतीमध्ये हिरव्या मिरच्या फेसलेल्या मोहोरीमध्ये घातल्या जातात. मिरचीचे लोणचे / फोडणीच्या मिरचीची कृती इथे पाहायला मिळेल.

chilli pickle, chilli recipe, how to make chili pickle
साहित्य:
१/२ कप मिरच्यांचे तुकडे
१/८ कप मिठ
१/२ टिस्पून हिंग
१/४ कप मोहोरी पावडर (लाल)
१/२ कप पाणी
१ टेस्पून लिंबाचा रस
फोडणीसाठी::
१/८ कप तेल
१/८ टिस्पून मोहोरी (Benefits of Mustard Seeds)
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद

कृती:
१) मिरच्यांचे तुकडे एका वाडग्यात काढावेत. त्यात मिठ आणि हिंग घालून निट मिक्स करावे. १० ते १५ मिनीटे झाकून ठेवावे.
२) १/२ कप पाण्यात १/४ कप मोहोरी पावडर घालून १० मिनीटे भिजवून ठेवावी. लहान मिक्सरमध्ये हे मिश्रण घालून १ ते २ मिनीटे फिरवावी. हे मिश्रण चांगले फेसले गेले पाहिजे आणि पांढरट रंग आला पाहिजे.
३) हि फेसलेली मोहोरी पावडर मिरचीमध्ये घालावी. फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी एका वाटीत घालावी आणि थंड झाली कि मिरचीमध्ये घालावी. मिक्स करून त्यात लिंबाचा रस घालावा.
हि रसाची मिरची फार टिकाऊ नाही साधारण १५ एक दिवस बाहेर टिकते. शक्यतो फ्रिजमध्ये ठेवून द्यावे. सहज महिना दोन महिने टिकते.

Labels:
Rasachi Mirchi, Mirchiche Lonche, Green Chili Pickle, Mirachiche Lonache, Mirachi Lonache

कैरीचे इंस्टंट गोड लोणचे - Sweet Mango Pickle

Instant Mango Pickle in English

वाढणी: ३/४ कप
Mango Pickle, Sweet Mango Pickle, Ambyache Lonache, aamka achar, meetha achar recipe,aam aur gudh ka achara
साहित्य:
१/२ ते पाउण कप साल काढलेल्या फोडी (१ सेमी आकाराच्या फोडी)
१/२ कप किसलेला गूळ
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून मिठ
फोडणीसाठी: १ ते दिड टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद

कृती:

१) फोडींना आधी १० मिनीटे मिठ चोळून ठेवावे.
२) गूळ एका पातेल्यात घेऊन त्यात एक टेस्पून पाणी घालावे. गूळ पातळ करावा. गूळ पातळ झाला कि लगेच गॅसवरून उतरवावा, कोमट होवू द्यावा. गूळ कोमट झाला कि फोडींवर घालावा, तिखट घालावे आणि ढवळावे.
३) कढल्यात फोडणी करताना, तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग व हळद घालावी. हि फोडणी जरा कोमट झाली कि लोणच्यात घालावी.

हे लोणचे फार दिवस टिकत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणातच करावे.

Label:
Mango Pickle, Kairiche Lonache, Tangy Pickle

मिरचीचे लोणचे - Mirchiche Lonche

Indian chili Pickle in English

Lonache, Mirchiche Lonache, Chili Pickle, Indian Pickles recipe, how to make pickle, hot and spicy, condiments, indian food, local restaurant, pickle recipes
साहित्य:
१ ते सव्वा कप हिरव्या मिरचीचे तुकडे (१ सेमी)
३ टेस्पून मिठ किंवा चवीनुसार
१/३ कप मोहोरी पावडर (लाल मोहोरी)
१/२ टेस्पून हिंग
फोडणी: १/४ कप तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
१०-१२ मेथी दाणे

कृती:
१) मिरचीला आधी मिठ, हिंग लावून ठेवावे.
२) तेल तापवावे. त्यात आधी मेथीदाणे तळून घ्यावेत. बाहेर काढून कुटावेत आणि मिरचीमध्ये घालावेत.
३) त्याच तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी थंड होवू द्यावी.
४) फोडणी थंड झाली कि मिरचीमध्ये ओतावी, मोहोरी पावडर घालावी. सर्व निट मिक्स करून घ्यावे.
५) स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी.
सर्व्ह करताना आयत्यावेळी लिंबाचा रस घालावा.

Labels:
Mirchi Lonache, Chili pickle, hot and spicy chili pickle, indian style chili pickle