Showing posts with label Beet. Show all posts
Showing posts with label Beet. Show all posts

बिटाचा ज्युस - Beet Root Juice

Beet Root Juice in English

वेळ: १५ मिनीटे
वाढणी: २ ग्लास

beetroot juice, tomato juice, Carrot juice, beetacha juiceसाहित्य:
१ बीट, मध्यम
१ टोमॅटो, मध्यम
१ गाजर, मध्यम
१/३ कप पाणी
१/४ टिस्पून जिरेपूड
मिठ साखर चवीनुसार
१ टिस्पून लिंबाचा रस (ऐच्छिक)

कृती:
१) बिट आणि गाजर प्रेशर कूकरमध्ये १ शिट्टी होईपर्यंत शिजवावे (टीप १). नंतर गाजर आणि बीटाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. टोमॅटोसुद्धा मध्यम चिरून घ्यावा.
२) बिट, गाजर आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. अगदी गरज वाटली तरच थोडेसे पाणी घालावे.
३) स्वच्छ कापडातून बिट-गाजर-टोमॅटोचे वाटण घट्ट पिळून गाळून घ्यावे.
४) या ज्युसमध्ये जिरेपूड आणि मिठ घालून मिक्स करावे. यामध्ये साखर आणि लिंबाचा रस घालावा (टीप २).

टीप:
१) बीट आणि गाजर कच्चे वापरले तरीही चालेल.
२) ज्युसमध्ये कदाचित साखर घालावी लागणार नाही. बिटाचा गोडपणा पुरेसा होईल तसेच जर टोमॅटोची चव गरजेपुरती आंबट असेल तर लिंबाचा रसही वापरावी लागणार नाही.

बिटाची कोशिंबीर - Beetachi Koshimbir

Beetroot salad in English

beetroot recipe, indian beetroot recipe, beetachi koshimbir, healthy salad recipe, oilfree food recipe, oilfree recipes
साहित्य:
३/४ कप किसलेले बिट (साधारण १ बिट)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेला टोमॅटो
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून लिंबाचा रस
मिठ साखर चवीनुसार

कृती:
१) बिट शक्यतो कच्चेच घ्यावे, पण कच्च्या बिटाची चव आवडत नसेल तर कूकरमध्ये १ शिट्टी करून अगदी थोडेच शिजवून घ्यावे. जास्त शिजवू नये.
२) बिटाचे साल काढून बिट किसून घ्यावे. त्यामध्ये वरील जिन्नस एकत्र करून चमच्याने एकजीव करून घ्यावे.

जेवणात हि बिटाची कोशिंबीर तोंडीलावणी म्हणून छान लागते.

Labels:
Beetroot raita, Beetachi koshimbir, beetroot recipe, beetroot salad recipe