Tomato Bhaji (English Version)
साहित्य:
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/२ कप चिरलेला कांदा
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/८ टिस्पून हळद, २-३ कढीपत्ता पाने
२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/२ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून गुळ
चवीनुसार मिठ
१ टेस्पून कोथिंबीर
कृती:
१) कढईत तेल गरम करून जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी. आले पेस्ट घालून काही सेकंद परतावे. त्यात चिरलेला कांदा घालावा. थोडे मिठ घालून कांदा परतून घ्यावा.
२) कांदा निट शिजला कि त्यात चिरलेला टोमॅटो घालून ढवळावे. मध्यम आचेवर झाकण ठेवून टोमॅटो शिजू द्यावा.
३) टोमॅटो अर्धवट शिजला कि त्यात गूळ घालावा. निट मिक्स करून टोमॅटो शिजू द्यावा. गरजेनुसार मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
तयार भाजी गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Tomato Curry, Indian Tomato Curry, Tomatochi bhaji, Sweet and sour Tomato Curry
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment