Upavasache Ghavan (English Version)
साहित्य:
१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
साजूक तूप
कृती:
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.
गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.
टीप:
१) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेले होते आणि घावन कालथ्याने उलथायला सुद्धा त्रास होतो. म्हणून पहिल्या घावनाला वाफ काढून पाहावी. जर घावन चिकट होत असेल तर वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
२) घावनात थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा छान लागते.
3) मिरची आवडीनुसार कमीजास्त वापरावी.
चकली
Labels:
Fasting Recipes, Sabudana Ghavan, Sago Recipes, Fasting meal, Fasting food. Vari Tandul recipe, sabudana recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment