Chinese Stir Fried Vegetable with white Rice (English Version)
वाढणी : २ जण
साहित्य:
::::भातासाठी::::
पाउण कप बासमती तांदूळ
दिड ते दोन कप पाणी
चवीपुरते मिठ
१ चमचा तेल
::::भाजीसाठी::::
दिड ते पाऊणेदोन कप भाज्या (गाजर, कांदा, भोपळी मिरच्या, बेबी कॉर्न, फ्लॉवर इत्यादी)
मी घेतलेले प्रमाण:
१/२ कप भोपळी मिरची, उभी पातळ चिरून
१/४ कप बेबी कॉर्न (१/२ इंच तुकडे)
१/४ कप फ्लॉवर (लहान तुरे)
१/४ कप गाजर, उभे पातळ चिरून (१ इंच)
६ ते ७ बटाट्याच्या पातळ चकत्या
१/४ कप कांदा उभा पातळ चिरलेला
--
दिड टेस्पून सोयासॉस
१ टेस्पून कॉर्न स्टार्च/कॉर्न फ्लोअर
२ टिस्पून व्हिनेगर
१ टिस्पून चिली सॉस
१ टिस्पून आले पेस्ट
१/२ टिस्पून लसूण पेस्ट
२ सुक्या लाल मिरच्या
१ टेस्पून तेल
साखर, मिठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती:
१) तांदूळ धुवून घ्यावेत. अर्धा तास निथळत ठेवावे. पातेल्यात पाणी आणि धुतलेले तांदूळ घ्यावे. त्यात तेल आणि थोडे मिठ घालावे. मध्यम आचेवर तांदूळ शिजू द्यावेत. वरून शक्यतो झाकण ठेवू नये त्यामुळे भात चिकट होवू शकतो.
२) प्रथम चिरलेल्या भाज्यांपैकी बेबी कॉर्न, गाजर, फ्लॉवर, बटाट्याच्या पातळ चकत्या अर्धवट शिजवून घ्याव्यात, त्यासाठी २ कप पाणी गरम करत ठेवावे त्यात या भाज्या शिजवून उरलेले १/२ कप पाणी नंतर वापरण्यासाठी ठेवून द्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. लाल मिरच्या तोडून घालाव्यात. कांदा घालून अगदी थोडे परतावे. कांदा पूर्ण शिजू देवू नये.
४) नंतर भोपळी मिरची घालून परतावे. अर्ध्या शिजवलेल्या भाज्या घालाव्यात. निट मिक्स करून त्यात सोयासॉस, व्हिनेगर, आणि चिली सॉस घालून ढवळावे.
५) भाज्यांचे उरलेले पाणी घ्यावे व त्यात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे. हे मिश्रण भाज्यांमध्ये घालावे. यामुळे भाजीला थोडी घट्टसर ग्रेव्ही तयार होईल. नंतर आवडीनुसार मिठ, साखर आणि मिरपूड घालावी.
हि भाजी तयार भाताबरोबर सर्व्ह करावी. भाजीबरोबर शेजवान सॉसही सर्व्ह करावा.
टीप:
१) भाजीत आवडत असल्यास टोफूही वापरू शकतो
Labels:
stir fry vegetables, Chinese stir fry vegetables, stir fried vegetables
चायनिज स्टर फ्राय वेजिटेबल विथ राईस - Chinese Stir fried vegetables with Rice
Labels:
Bhaji,
Cauliflower,
Indo-Chinese,
Main Dish,
P - T
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment