लसणीचे वरण - Lasaniche Varan

Garlic Dal in English

वाढणी: साधारण दिड ते २ कप (२ जणांसाठी)


Garlic Dal, Dal Tadka, Garlic flavored dal, Indian dal recipe, Grocery, Target, Food, Indian food, Vegetarian diet food, soup

साहित्य:
१/२ कप तुरडाळ
२ लसूण पाकळ्या
३ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
३-४ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
२ टिस्पून लिंबाचा रस
मिठ

कृती:
१) १/२ कप तुरडाळ स्वच्छ धुवून प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी.नंतर रवीने किंवा चमच्याने घोटून घ्यावे.
२) लसणीच्या पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्याव्यात. मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात.
३) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या

फोडणीत घालून १५ सेकंद परतावे. कोथिंबीर घालावी आणि ५-७ सेकंद परतून घोटलेली डाळ घालावी.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.मिठ घालावे. १-२ वेळा उकळी काढावी. लिंबाचा रस घालावा.
हे लसणीचे वरण गरम गरम तूप-भाताबरोबर वाढावे.

Labels:
Dal Tadka, phodaniche varan, lasun dal, lasoon dal, Maharashtrian Dal

No comments:

Post a Comment