पिझ्झा बेस - Pizza Base

Pizza Base in English

वाढणी : १ थिन क्रस्ट पिझ्झा बेस

Pizza, Mozzarella Cheese, Vegetable Pizza Recipe, Indian style Pizza, Cheese Pizza
साहित्य:
३/४ कप मैदा
१ टिस्पून ड्राय यिस्ट
१/२ टिस्पून साखर
१/२ टिस्पून मिठ
१/४ कप कोमट पाणी
थोडा सुका मैदा पिझ्झा लाटताना

कृती:
१) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय यिस्ट व १/२ टिस्पून साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे. ५ ते १० मिनीटात हे मिश्रण फेसाळेल.
२) ३/४ कप मैदा वाडग्यात घेऊन हे फेसाळलेले मिश्रण त्यात घालावे, मिठ आणि थोडे तेल घालावे. गरजेनुसार थोडे कोमट पाणी घेऊन पिठ एकदम मऊसर मळून घ्यावे (साधारण ७-८ मिनीटे) . मळलेले पिठ एकदम Elastic झाले पाहिजे. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून एका काचेच्या किंवा इतर कोणत्याही, बर्‍यापैकी खोलगट (साधारण ६-७ इंच ) भांड्यात ठेवून वरून निट झाकावे. उबदार ठिकाणी हे भांडे दिड तास ठेवावे म्हणजे पिठ फुगून येईल.
३) मळलेले पिठ व्यवस्थित फुगले कि ओव्हन ४८० F (२५० C) वर प्रिहीट करावे. यिस्टमुळे पिठात हवेचे बुडबुडे तयार होतात, म्हणून पिठ परत एकदा निट मळून घ्यावे (३ मिनीटे). मळताना थोडा तेलाचा हात लावावा.
४) सुका मैदा भुरभूरवून जाडसर पोळी लाटावी (१ सेमी). काट्याने (Fork) पूर्ण पोळीवर टोचावे म्हणजे बेक करताना फुगणार नाही. पोळीला वरून थोडे तेल लावावे.
५) साधारण ६-८ मिनीटे बेक करून घ्यावे.

पिझ्झा सॉसची कृती (Pizza Sauce)
पनीर पिझ्झाची कृती (Paneer Pizza)

Labels:
Pizza Base, Easy Pizza Base Recipe, Pizza Dough

No comments:

Post a Comment