Soya Granules Cutlet in English
साहित्य:
१ कप न्युट्रेला सोया ग्रॅन्युल्स
(मी रूची ब्रँडचे सोया ग्रॅन्युल्स वापरले होते)
१ कप उकडलेला बटाटा, किसून
१/२ कप वाफवलेले मटार
१ किसलेले गाजर
७-८ वाफवलेली फरसबी, बारीक चिरून
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून जिरेपूड
१/४ कप कांदा, पातळ उभा चिरून
१ टिस्पून आले पेस्ट
५-६ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
६-७ कढीपत्ता
२ टेस्पून बेसन
१ टिस्पून तेल
चवीनुसार मिठ
१/२ कप भाजलेला रवा
शालो फ्राईंगसाठी तेल
कृती:
१) ३ ते ४ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात १ टिस्पून मिठ आणि १ कप न्युट्रेला ग्रॅन्युल्स आणि घालून ५ मिनीटे मध्यम आचेवर उकळवावे. नंतर हे ग्रॅन्युल्स चाळणीत काढून १० मिनीटे निथळत ठेवावे. १-२ वेळा थंड पाण्याने धुवून घ्यावे. पाणी निथळून गेले कि ग्रॅन्युल्स हाताने पिळून घ्यावेत. पाणी राहू देवू नयेत.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आले पेस्ट घालावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा परतला गेला कि त्यात बेसन घालून मंद आचेवर परतावे. बेसन निट परतले गेले कि हे मिश्रण दुसर्या वाडग्यात काढून ठेवावे.
३) एका मोठ्या भांड्यात शिजवलेले ग्रॅन्युल्स, उकडलेला बटाटा, वाफवलेले मटार, किसलेले गाजर, फरसबी, कोथिंबीर, जिरेपूड, बेसनाचे मिश्रण आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. वाटल्यास थोडे लाल तिखट घालावे. निट मिक्स करावे.
४) वरील मिश्रणाचे मध्यम आकाराचे चपटे कटलेट करावे. भाजलेल्या रव्यामध्ये घोळवून, मध्यम आचेवर हे कटलेट शालो फ्राय करावेत.
टीप:
१) जर लसणीचा फ्लेवर आवडत असेल तर १/२ टिस्पून लसणीची पेस्ट फोडणीत घालावी.
२) भाजलेल्या रव्याऐवजी कोटींगसाठी ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकतो.
Labels:
Nutrela Granules, Soya Granules Cutlet, Healthy Cutlet
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment