मेदू वडा - Medu Vada Sambhar

Medu Vada Sambhar in English

मेदू वडा

वाढणी: साधारण ४ प्लेट (१२ मध्यम वडे)

medu Vada sambhar recipe, medu wada recipe
साहित्य:
दिड कप उडीद डाळ
४ ते ६ मिरे, भरड कुटलेले
२ टेस्पून खोबर्‍याचे पातळ काप (१ सेंमी)
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५ ते ६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/२ टिस्पून जाडसर किसलेले आले
चवीपुरते मिठ

Click here to see how to prepare vada step by step

medu vada sambar, south Indian recipe, Medu Vada, Medhu Wada
कृती:
१) उडीद डाळ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये (टीप १ आणि ३).
२) मिक्सरमधून वाटण एका खोलगट वाडग्यात काढावे. हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटावे. यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, तसा फरक लगेचच जाणवतो. नंतर मिरे, खोबर्‍याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.
३) वडे तळायला घ्यायच्या आधी एका बोलमध्ये पाणी घ्यावे. उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा, म्हणजे वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडताना पिठ हाताला चिकटणार नाही.
४) तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम हायवर ठेवावा. (टीप २)


Click here to see मेदू वडा बनवण्याच्या 3 पद्धती

वडे सोनेरी किंवा गडद सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चटणी आणि सांबाराबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) मिश्रण खुप घट्ट वाटत असेल आणि हलके वाटत नसेल अशावेळी एक वडा तळून बघावा, वडा आतून गच्चं लागत असेल तर अगदी किंचीत पाणी घालावे.
२) वडे बारीक आचेवर तळू नयेत त्यामुळे वडे तेलकट होतात.
३) भिजवलेले पिठ पातळ झाले तर पिठाला दाटपणा येण्यासाठी २ ते ३ चमचे तांदूळाचे पिठ वापरतात. तांदूळाच्या पिठामुळे वडे वरून कुरकूरीत होतात परंतु आतून किंचीत घट्ट राहतात.

Labels:
Medu Vada Sambhar, Udipi Vada Sambhar, Medu Wada Sambar

No comments:

Post a Comment