साधारण १५ मध्यम चकल्या
वेळ: ४० मिनीटे
१ कप गव्हाचे पिठ
१ टेस्पून दही
१/२ टिस्पून ओवा
१/२ टिस्पून तिळ
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ ते दिड टिस्पून लाल तिखट
चवीनुसार मिठ
पिठ भिजवायला पाणी
तळायला तेल
जाड कापड (साधारण १ फुट)
बारीक भोकांची किसणी
कृती:
१) जाड कापडात गव्हाचे पिठ घट्ट बांधून घ्यावे. प्रेशर कूकरमध्ये तळाला २ ते ३ भांडी पाणी घालावे. लोखंडी तिपाई किंवा कूकरमधील भांडे ठेवून त्यावर एक स्टीलची चाळणी ठेवावी. त्यात गव्हाचे पिठ बांधलेली कापडाची पुरचूंडी ठेवावी. २ ते ३ शिट्ट्या कराव्यात आणि गॅस बंद करावा.
२) प्रेशर कूकर गार झाल्यावर त्यातील पुरचूंडी उघडून त्यात तयार झालेला पिठाचा घट्ट गोळा काढून घ्यावा. बारीक किसणीवर किसून घ्यावा. जर छोट्या गुठळ्या राहिल्या असतील तर हाताने फोडून घ्याव्यात किंवा बारीक चाळणीने चाळून जाडसर गोळे फोडून घ्यावेत. पिठ एकदम बारीक असावे.
३) या पिठात दही, ओवा, तिळ, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट आणि मिठ घालावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे.
४) चकलीच्या सोर्याला आतून तेलाचा हात लावावा. आणि १ चकली पाडून बघावी. जर चकली तुटत असेल तर अगदी थोडे पाणी घालून पिठ मळून घ्यावे.
५) तेल गरम करून मिडीयम-हाय गॅसवर चकल्या तळून घ्याव्यात. थोडावेळ जाळीवर गार होण्यासाठी ठेवाव्यात आणि मग लगेच हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
Labels:
Wheat flour chakli, kankechya chaklya
No comments:
Post a Comment