साहित्य:
४ मोठे कप वेजिटेबल स्टॉक
४-५ फरसबी बारीक चिरून
अर्धी वाटी गाजर किसून
अर्धी वाटी कोबी अगदी पातळ चिरून
३-४ मश्रूम पातळ चिरून
एक लहान हिरवी भोपळी मिरची पातळ चिरून
अर्धी वाटी चिरलेला कांदा
२-३ काड्या पाती कांदा बारीक चिरून
३-४ अगदी बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
१ चमचा बारीक चिरलेले आले
२ चमचे व्हिनेगर
२ चमचे सोया सॉस
१ चमचा कॉर्न स्टार्च/ कॉर्न फ्लोअर
२ हिरव्या मिरच्या
चवीपुरते मिठ
१/२ चमचा साखर
२ चमचे तेल
१ वाट्या जाड चपट्या शेवया
कृती:
१) पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, १ लहान चमचा मिठ घालावे. त्यात शेवया घालून पास्ताला शिजवतो तशा शिजवाव्यात. गाळून गार करत ठेवाव्यात. त्यातील पाणी निघून गेले कि २०-२५ मिनीटांनी शेवया तेलात गोल्डन ब्राउन तळून घ्याव्यात.
२) लोखंडी कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात लसूण, आले, मिरच्या घालून परतून घ्यावे. नंतर कांदा घालून परतावे.
३) त्यात गाजर, फरसबी, कोबी घालून १-२ मिनीटे परतून घ्यावे. शेवटी मश्रूम आणि भोपळी मिरची घालून अर्धा मिनीट परतावे.
४) सोया सॉस घालून १०-१५ सेकंदांनी वेजिटेबल स्टॉक घालावा. साखर आणि मिठ घालावे. उकळी येईस्तोवर बाजूला एक वाटी पाण्यात १ चमचा कॉर्न फ्लोअर मिक्स करून घ्यावे.
५) वेजिटेबल स्टॉकला उकळी आल्यावर मध्यम आचेवर कॉर्न फ्लोअरचे पाणी हळूहळू त्यात ओतावे. सूपला हवा तेवढा घट्टपणा आल्यावर त्यात व्हिनेगर घालून ढवळावे.
६) सर्व्ह करताना किंवा खाताना गरमगरम सूप Bowl मध्ये घ्यावे त्यावर तळलेल्या शेवया घालाव्यात. गरम गरम खावे.
टीप:
१) भाज्या परतताना शक्यतो पसरट कढई घ्यावी.
२) भाज्या परतताना कढई भरपूर तापलेली असतानाच भाज्या अर्ध्या कच्च्या राहतील अशा परताव्यात.
चकली
हॉट ऍन्ड सॉर सूप - Hot and sour soup
Hot And Sour Soup
Labels:
F - J,
Indo-Chinese,
Soup
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment