पनीर सिक्टी फाईव्ह - Paneer 65

Paneer 65 in English

साधारण २ जणांसाठी
वेळ: ४० मिनीटे

Paneer 65, Paneer recipe, Indian Cheese Paneer,साहित्य:
१ टेस्पून तेल
१ टेस्पून बारीक चिरलेले लसूण
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
२ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून जिरेपूड
१ टेस्पून कोथिंबीर
चिली गार्लिक पेस्ट: ५ सुक्या लाल मिरच्या + ३ मोठ्या लसणीच्या पाकळ्या + १ टेस्पून विनेगर
१ टेस्पून सोयासॉस
चवीपुरते मिठ
१/२ कप भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
२०० ग्राम पनीर, उभे तुकडे
मॅरीनेशनसाठी: १ टेस्पून कॉर्न फ्लोअर + २ टेस्पून पाणी + २ टिस्पून आलेलसूण पेस्ट
तळण्यासाठी तेल
६ ते ७ कढीपत्ता पाने (तळलेली)
१ टेस्पून पाती कांदा, बारीक चिरून

paneer 65, paneer stir fry, paneer chinese appetizer, indo chinese, authentic chineseकृती:
१) लाल मिरच्या विनेगरमध्ये १ तास भिजवून ठेवाव्यात. नंतर विनेगर, भिजवलेल्या मिरच्या आणि ३ लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करावा.
२) पनीर मॅरीनेट करण्यासाठी १ टेस्पून कॉर्न फ्लोअर, २ टेस्पून पाणी, आणि २ टिस्पून आलेलसूण पेस्ट मिक्स करावे. पनीर मॅरीनेट करून डिप फ्राय करून घ्यावे. खुप जास्त ब्राऊन करू नयेत. गुलाबीसर रंग येईस्तोवर तळावेत.
३) एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात चिरलेले आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. आले लसूण ब्राऊन होईस्तोवर परतावे.
४) नंतर लाल तिखट, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून परतावे. नंतर चिली गार्लिक पेस्ट, सोयासॉस, आणि १ टेस्पून उरलेले मॅरीनेशन घालून ढवळावे. चवीनुसार मिठ घालावे.
५) आता भोपळी मिरची घालून १ मिनीटभर परतावे. नंतर पनीरचे तळलेले तुकडे घालावेत आणि साधारण ३० ते ४० सेकंद परतावे, पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये चांगले घोळले गेले पाहिजेत. सर्व्हींग प्लेटमध्ये सर्व्ह करून थोडी काळी मिरी घालावी. पाती कांदा आणि तळलेला कढीपत्ता घालून डीश सजवावी.

labels:
Paneer 65, Spicy paneer recipe, Paneer chinese recipe

No comments:

Post a Comment