साहित्य:
२ कप गव्हाचे पिठ
१/४ कप पुदीना पाने, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
२ मिरच्या, एकदम बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून ओवा
१/२ कप दही
१ टेस्पून चाट मसाला
१ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल + पराठे भाजण्यासाठी तेल
कृती:
१) परातीत गव्हाचे पिठ, पुदीना, कोथिंबीर, मिरची, जिरे, ओवा, २ टेस्पून तेल आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. दही घालून छान मळून घ्यावे. प्लेन गोळा बनवून त्याला बाहेरून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ सुकणार नाही. साधारण १/२ तास झाकून ठेवावे.
२) मळलेल्या पिठाचे साधारण ६ गोळे करून घ्यावे. पातळ पोळी लाटून त्यावर थोडे तेल लावावे. त्यावर थोडा चाट मसाला आणि गरम मसाला भुरभूरावा. हातातील उघडझाप करणार्या पंख्यासारख्या घड्या घालाव्यात. सर्व लेयर्स वर दिसतील अशाप्रकारे धरावे. नंतर एक टोक हातात धरून दुसरे टोक पहिल्य़ा टोकाभोवती फिरवावे आणि घट्ट रोल करावा. सर्व लेयर्स वर दिसले पाहिजेत.
३) थोडे पिठ भुरभूरवून परत लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकावे. भाजताना थोडे तेलही घालावे. पराठा तयार झाला कि दोन्ही हातात धरून अगदी अलगद चुरगाळावा म्हणजे सर्व लेयर्स व्यवस्थित सुटतील. जोरात चुरगळू नये.
स्टेप २ सोपी करण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओप्रमाणे पराठा तयार करावा.
मध्यम आकाराचे पराठे बनवावेत. गरमागरम पराठे दही आणि लोण्याबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) डाएट पराठा करण्यासाठी तेल न घालता पराठा बनवावा. फक्त हा पराठा किंचीत कोरडा होतो.
No comments:
Post a Comment