Batata Vada in English
वेळ: ३५ ते ४० मिनीटे
नग: १२ ते १४ वडे
साहित्य:
वडापाव करायचा असल्यास लादीपाव
४ शिजवलेले मोठे बटाटे
४ ते ५ हिरव्या मिरच्या
वडे तळण्यासाठी तेल
१ टिस्पून चमचा उडीद डाळ
४-५ लसणींची पेस्ट
१ इंच आले पेस्ट
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून कोथिंबीर
१ टेस्पून लिंबाचा रस
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद
चवीपुरते मीठ
आवरणासाठी
१ कप चणा पिठ, ३/४ ते १ कप पाणी, १/२ टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
कृती:
१) शिजवलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यावे. किसणीवर किसू नये एकदम लगदा पण चांगला लागत नाही. तसेच खुप गुठळ्याही ठेवून नये. (नोट ३)
२) कढईत २ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. थोडे परतून त्यात उडीद डाळ घालावी. उडीद डाळ गोल्डन ब्राउन झाली कि त्यात कुस्करलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मीठ घालावे. मीठ आणि फोडणीचे तेल बटाट्याला व्यवस्थित लागेल असे कालथ्याने मिक्स करावे. लिंबूरस घालावा. तयार भाजीचे २ इंच इतपत गोळे करावे.
३) भाजी तयार झाली कि आवरणासाठी चणा पिठ पाण्यात भिजवावे. अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
४) कढईत तेल गरम करावे. तळताना वडा तेलात पुर्ण बुडेल इतपत तेल कढईत घालावे. तेल व्यवस्थित तापू द्यावे. भिजवलेल्या पिठाचा एक थेंब तेलात टाकावा. जर तो टाकल्या टाकल्या वर आला तर तेल तापले आहे असे समजावे. तेल तापले कि गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
४) भिजवलेल्या पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा. असे तिन चार वडे (किंवा तळताना कढईत सुटसुटीत मावतील एवढे) गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावेत.
कोथिंबीर मिरचीच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा लसणीच्या तिखटाबरोबर गरमागरम खावेत.
टीप:
१) पावामध्ये चटणी आणि वडा घालून वडा पावही खाऊ शकतो.
२) वड्यातील भाजीचा तिखटपणासाठी आवडीनुसार मिरचीचा ठेचा वापरावा.
३) रेड पोटॅटो वडे बनवायला वापरू नये. वड्याचे सारण चिकट होते. रसेट पोटॅटो चालतील.
Labels:
Batata Wada, Batata Vada, Potato Vada, Maharashtrian Batata wada, Mumbai Vada Pav, Vada Pav recipe, Aloo Bonda Recipe
बटाटा वडा पाव- Batata Wada pav
Labels:
A - E,
Appetizers,
Fried,
Maharashtrian,
Potato,
Snacks,
Vade/Bhaji
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment