ताकातली उकड - Takachi Ukad

Takatali Ukad (English Version)

ukad, takachi ukad, ukad recipe

साहित्य:
२ कप आंबट ताक
तांदूळाचे पिठ
३-४ लसूण पाकळ्या
१ इंच आल्याचा तुकडा
३-४ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग,१/२ टिस्पून हळद
३-४ कढीपत्ता पाने
१ टेस्पून तेल
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) कढईमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालावे. लसूण, आले ठेचून घालावे. सर्व व्यवस्थित परतले कि ताक घालावे. ताकाला उकळी येईस्तोवर ढवळत राहावे ज्यामुळे ताक फुटणार नाही.
२) ताकाला उकळी आली कि त्यात चवीपुरते मिठ घालावे. आणि तांदळाचे पिठ वरून भुरभुरावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण भराभर पिठ घातले तर हमखास गुठळ्या होतात. उकडीला जेवढा घट्टपणा हवा असेल तेवढे तांदूळाचे पिठ हळूहळू घालत ढवळत राहावे. वाफ काढावी.

टीप:
१) अजून एका पद्धतीने उकड बनवता येते. ताक थेट फोडणीस न घालता, ताकात तांदूळाचे पिठ घालून मध्यम दाटसर पेस्ट बनवून घ्यावी, मिठ घालावे. आणि हि पेस्ट फोडणीस घालावी. आणि लगेच ढवळावे. यामध्ये गुठळ्या पटकन होतात त्यामुळे थोडे अलर्ट राहावे.
२) काहीजणांना एकदम घट्ट उकड आवडते. तशी उकड हवी असेल तर पिठाचे प्रमाण थोडे वाढवावे. उकडीची वाफ मुरली कि गरम असतानाच तेलाने उकड छान मळून घ्यावी आणि मग खावी.

Labels:
Buttermilk, buttermilk recipe, ukad recipe, Maharashtrian Ukad, ukadichi recipe

No comments:

Post a Comment