वेजिटेबल कटलेट - Vegetable Cutlet

Vegetable Cutlet in English

veg cutlet, vegetable cutlet recipe
साहित्य:
१ शिजलेला बटाटा
१/२ कप मटार
१/४ कप गाजराचे तुकडे
१/४ कप फरसबीचे तुकडे
१ छोटा कांदा
१ टेस्पून लसूण पेस्ट
५ टेस्पून चणा पिठ
६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट
१ टिस्पून गरम मसाला
१ टिस्पून चाट मसाला
१ टिस्पून आमचूर पावडर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेला रवा
तेल
मीठ

कृती:
१) मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला कि त्यात चण्याचे पिठ घालावे, पिठ खमंग भाजून घ्यावे.
२) एका भांड्यात शिजलेला बटाटा किसून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले चणा पिठ घालून एकत्र करावे. चणा पिठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा व इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा.
३) मिश्रणाचे समान भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १-२ तेल गरम करत ठेवावे. कटलेटला भाजलेला रवा दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्यावे.

Labels:
Veg Cutlet, Cutlet recipe, vegetable cutlet, Veggir Cutlet recipe, cutlet recipe

No comments:

Post a Comment