वेज बर्गर - मूग पॅटीस - Veg Burger

Veg Burger - Moog Pattie (English Version)


Moong pattie, moong patty, veg moong burger, veggie burger, indian burger
साहित्य:
५-६ बर्गर बन्स
२ टेस्पून बटर
चिज स्लाईसेस
कांदा टोमॅटोच्या गोल चकत्या
टोमॅटो केचप
पॅटीससाठी साहित्य:
१ कप मोड आलेले मूग
१ मोठा शिजवलेला बटाटा
१ मध्यम कांदा
१ लहान आल्याचा तुकडा
३ टेस्पून चमचे बेसन
५-६ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर मिरचीची चटणी (ऑप्शनल)
१/२ कप चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून आमचूर पावडर
तेल
मीठ

कृती:
१) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात आले बारीक किसून घालावे. मिरच्या बारीक करून घालाव्यात, नंतर बारीक चिरलेला कांदा घालून थोडावेळ परतावा. कांदा गोल्डन ब्राऊन झाला कि त्यात बेसन घालावे. खमंग भाजून घ्यावे. थंड होवू द्यावे.
२) मूग कूकरमध्ये घालून १-२ शिट्ट्या कराव्यात, अगदी पुर्ण शिजवू नयेत. अधिकचे पाणी काढून घ्यावे.
२) शिजलेला बटाटा किसून घ्यावा.त्यात मूग, भाजलेले बेसन, मीठ, आमचूर पावडर, कोथिंबीर घालून एकजीव मळून घ्यावे.
३) मिश्रणाचे पॅटीस करून घ्यावेत. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करावे. त्यात पॅटीस दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्याव्यात.
४) बर्गर बन्सच्या खालच्या स्लाईसला बटर लावून घ्यावे. त्यावर तयार पॅटीस ठेवावे. पॅटीसला थोडी हिरवी चटणी लावावी. त्यावर एक टोमॅटो, कांद्याचा स्लाईस, चिजचा स्लाईस ठेवावा. वरून दुसरा ब्रेडचा स्लाईस ठेवावा. ३५० F वर ६-७ मिनीटे ओव्हनमध्ये बेक करावे. टोमॅटो सॉसबरोबर गरम खावे.

टीप:
१) पॅटीस शालो फ्राय करताना आवडत असल्यास पॅटीसला दोन्ही बाजूला भाजलेला रवा लावल्यास मस्त क्रिस्प येतो.
२) कांदा, टोमॅटो बरोबर अजून एक दोन पालकाची आणि कोबीची पाने घालू शकतो.
३) बाजारात गव्हाच्या पिठाचे बन्स (wheat buns) उपलब्ध असतात. ते वापरल्यास आरोग्याच्या दृष्टीने चांगले.
४)मूग बटाट्याचे मिश्रण जर थोडे ओलसर झाले तरच ब्रेडचा स्लाईस बाईंडींगसाठी वापरावा. बेसन घातलेले असल्याने शक्यतो गरज लागत नाही.

Labels:
Veg burger, veggie burger, homemade burger, vegetarian burger

No comments:

Post a Comment