Ravyacha Cake (English Version)
साहित्य:
१ वाटी रवा
१ वाटी दही
१ वाटी दूध (दूध गरम नसावे)
१ वाटी साखर
१-२ चमचे तूप
१ चिमूटभर बेकिंग सोडा
वेलचीपूड / दालचिनी पावडर
सुकामेवा
बेक करण्यासाठी पसरट ओव्हन सेफ भांडे (eg. Pie Bakeware)
कृती:
१) रवा, दही, दूध, साखर, तूप एकत्र करून २०-२२ मिनीटे फेटावे. साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे. हे सर्व मिश्रण २-३ तास झाकून ठेवून द्यावे.
२) २-३ तासांनी ओव्हन ३७५ F (१९० C) प्रिहीट करायला लावावा. मधल्यावेळात ओव्हनसेफ भांड्याला तूपाचा हात लावून घ्यावा. नंतर १ चमचा पाण्यात चिमटीभर बेकिंग सोडा घालावा, मिक्स करून फेटलेल्या मिश्रणात घालावा.आवडीनुसार वेलचीपूड किंवा दालचिनी पावडर घालावी. मिश्रण १ मिनीट ढवळावे.
३) मिश्रण ओव्हनसेफ भांड्यात ओतावे. वरून काजू बदाम पिस्त्याचे तुकडे पसरावे. आणि ३७५ F ( १९० C) वर १८ ते २० मिनीटे बेक करावे. बेक करताना १०-१२ मिनीटानंतर मधेमधे ओव्हनमधील लाईट लावून केक चेक करावा.
४) केकच्या कडा ब्राऊन रंगाच्या होतात तसेच केकचा छान गंध सुटला कि केक झाला असे समजावे. ओव्हन बंद करून १-२ मिनीटांनी केक बाहेर काढावा. गरम गरम खायला छान लागतोच तसेच २ दिवस टिकतोसुद्धा !
टीप:
१) जर केकच्या आतसुद्धा सुकामेवा आवडत असेल तर बेक करायच्या आधी काजू बदामाचे तुकडे घालून ढवळावे मग मिश्रण बेकिंगच्या भांड्यात ओतून बेक करावे.
Labels:
Semolina cake, eggless cake, Rava cake, Farina Cake, Semolina dessert recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment