पाकातले बेसन लाडू - Besan Ladu

Besan Ladu (English Version)


Besab Ladu, chana pith ladu, besan recipe, laddu recipe, pakatle besan ladu
बेसनाचे लाडू पाक न करता हि बनवता येतात. बिन पाकाच्या बेसन लाडूच्या कृती साठी या लिंकवर क्लिक करा
बिन पाकाचे बेसन लाडू (Easy Besan Ladoo Recipe in English)

साहित्य:

१ वाटी बेसन
१/२ वाटी साजूक तूप
पाऊण वाटी साखर
अर्धी वाटी पाणी
वेलची पूड
बेदाणे

कृती:
१) तूप पातेल्यात गरम करावे त्यात बेसन घालून मध्यम आचेवर खमंग भाजावे. बेसन गॅसवरून उतरवावे.
२) पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवावे व त्याचा एकतारी पाक करावा.
३) तयार झालेला पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात घालून ढवळावे. ढवळताना बेसनाची गोळी होण्याची शक्यता असते. त्याची काळजी घ्यावी.
४) हळूहळू पाक बेसनात मुरतो. मध्येमध्ये मिश्रण ढवळत राहावे. मिश्रणात वेलची पूड घालावी.मिश्रण थोडे घट्टसर झाले कि लाडू वळावेत. लाडू वळताना त्यावर एक एक बेदाणा लावावा.

टीप :
१) वरील कृतीमध्ये तूप बेताचेच घातले असल्याने मिश्रण पटकन आळते त्यामुळे मिश्रणावर लक्ष ठेवावे. मिश्रण जास्त आळले तर लाडू वळता येत नाहीत.

Labels:
Besan Recipes, besan laddu recipe, chickpea flour recipe, Indian sweets recipe, Indian sweet

No comments:

Post a Comment