Paneer Masala (English Version)
साहित्य:
२०० ग्राम पनीर
२-३ चमचे बटर
१ चमचा आलेलसूण पेस्ट
१ मध्यम कांदा
१ चमचा धणेपूड
१/२ चमचा गरम मसाला पावडर
२ चमचे लाल तिखट
१ चमचा टोमॅटो सॉस
२ लहान टोमॅटो
१ कप दूध
तेल
चिरलेली कोथिंबीर
मीठ
कृती:
१) सर्वप्रथम पनीरचे तुकडे करून ते नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून शालो फ्राय करून घ्यावे.
२) कांदा उभा पातळ चिरून घ्यावा आणि नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेलावर खरपूस तळून घ्यावा. पेपर टॉवेलवर काढून अधिकचे तेल काढून टाकावे.
३) २ टोमॅटो उकडून घ्यावेत. साले काढून त्याची दाटसर प्युरी करावी.
४) १ चमचा धणेपूड, १/२ चमचा गरम मसाला, २ चमचे लाल तिखट, १ चमचा टोमॅटो सॉस, २ लहान टॊमेटोची प्युरी, १ कप दूध एकत्र ढवळून ग्रेव्हीसाठी मिश्रण तयार करावे. मिश्रण एकदम पातळ किंवा एकदम घट्ट नसावे.
५) कढईत बटर वितळवावे. आले लसूण पेस्ट घालून परतावी. तळलेला कांदा घालावा. ग्रेव्हीसाठी तयार केलेले मिश्रण घालावे. मध्यम आचेवर ५ मिनीट झाकण ठेवून शिजू द्यावे. मीठ घालावे. फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालावे. १ उकळी काढावी. कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करावे.
टीप :
१) आवडत असल्यास वरून थोडे क्रिम घालावे.
Labels:
Paneer Masala, Paneer Recipes, Paneer Curry recipe, Punjabi Paneer Recipes, North Indian Spicy food
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment